राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

 राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. The strike of resident doctors in the state is over

संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

निवासी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्यांबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १४३२ पदे भरली जातील. डॉक्टरांचे विविध प्रकारचे देणे लवकरात लवकर अदा केले जाईल असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू ठेवावे ही मागणी करतानाच, संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विरोध दर्शवण्यासाठी 16 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता.The strike of resident doctors in the state is over

ML/KA/PGB
03 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *