भांडवली बाजाराची (Stock Market) चढउताराची मालिका सुरूच.

 भांडवली बाजाराची (Stock Market) चढउताराची मालिका सुरूच.

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

गेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने प्रचंड चढउताराची मालिका सुरूच ठेवली. F&O एक्सपायरी,रशिया-युक्रेन युद्धाभोवतीची अनिश्चितता,आगामी धोरणात US Fed ने आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे दिलेले संकेत,चीन मधील बीजिंग शहरातील पुन्हा एकदा कोविडची वाढती रुग्णसंख्या,जगामधील ऊर्जेचे वाढते संकट यामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली.विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा सुरूच राहिला. (In the month of April so far FIIs sold equities worth Rs 40,652.71 crore).शुक्रवारी अमेरिकन बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरण झाली. डाऊ जोन्स ९३९ अंकांनी घसरला.

येणाऱ्या आठवड्यात बाजाराचे लक्ष कंपन्यांचे तिमाही निकाल,४ मे रोजी LIC IPO, Usd Fomc Statement, ECB non-monetary policy meeting, Australia and Europe retail sales तसेच ५ मे रोजी होणाऱ्या fomc press conference, BOE interest rate decision(May), BOE MPC meeting minutes, रुपयाची वाटचाल ,विदेशी गुंतवणूकदारांचे खरेदी/विक्रीचे आकडे याकडे असेल. बाजारात चढउताराचे प्रमाण जास्त असल्याने गुंतवणूकदारानी संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.

तांत्रिकदृष्ट्या बाजार थोडा कमजोर आहे. निफ्टीसाठी १६,९००-१६८०० हे स्तर महत्वाचे ठरतील हे स्तर तोडल्यास बाजार अजून घसरण्याची शक्यता. तसेच वर जाण्याकरिता निफ्टीने १७,२०० व १७,३०० चा स्तर तोडणे आवश्यक ठरेल.

बीजिंग शहरातील लॉक डाउनच्या शंकेने बाजरात घसरण. Market extends losses on Beijing lockdown fears

बाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. जागतिक बाजारातील कमकुवतपणा तसेच चीन मधील बीजिंग शहरात पुन्हा एकदा कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉक डाउन करण्यात येईल या भीतीने आशियाई बाजार चांगलेच घसरले. शुक्रवारच्या अमेरिकन मार्केटच्या घसरणीचा फटका सुद्धा बाजाराला बसला. निफ्टीने १७,००० चा मनोवैज्ञानिक स्तर देखील तोडला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ६१७ अंकांनी घसरून ५६,५७९ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २१८ अंकांची घसरण होऊन १६,९५४ चा बंददिला.

बाजारातील दोन दिवसांची घसरण थांबली. Market snaps 2-day losing streak

मंगळवारी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातील दोन दिवसांची घसरण थांबली. गॅप-अप स्टार्टनंतर बाजरात थोडी अस्थिरता जाणवली परंतु गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे व एप्रिलमधील विक्रमी जीएसटी संकलनाच्या अपेक्षेने बाजारातील सकारात्मकता शेवट पर्यंत टिकून राहिली बाजार बंद होताना १ टक्क्याहून अधिक वाढला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७७६ अंकांनी वधारून ५७,३५६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २४६ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १७,२०० चा बंददिला.

मंदीवाल्यांचा जोर पुन्हा वाढला. Bears are back in action

आदल्या दिवशीच्या तेजीनंतर पुन्हा एकदा बाजारावर मंदीवाल्याची पकड दिसली. कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर इक्विटी बाजार नकारात्मक नोटवर उघडला परंतु दुपारनंतर बाजाराने थोडी रिकव्हरी दाखवली. जगामधील ऊर्जेच्या वाढत्या संकटाची तीव्रता, कमकुवत चिनी आर्थिक दृष्टीकोन व यूएस दर वाढीच्या संभाव्यतेमुळे(an intensified energy crisis, weak Chinese economic outlook, US rate hikes) बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली. जगातील मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक कडकपणा, चीनमधील लॉकडाऊन आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जागतिक मंदीची शक्यता अधिक असल्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५३७ अंकांनी घसरून ५६,८१९ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १६२ अंकांची घसरण होऊन १७,०३८ चा बंददिला.

सेन्सेक्स ७०० अंकांनी वधारला.Sensex surges 700 points

गुरुवारी बाजाराने मागील दिवसाचे सर्व नुकसान भरून काढले बाजार एक टक्क्यांहून अधिक वाढला. बँक ऑफ जपानने आपल्या चलनविषयक धोरणामध्ये दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर(BOJ keeps interest rate targets unchanged) आशियाई बाजारात तेजी पसरली.भारतीय बाजारात सेन्सेक्सने ९०० अंकांची उसळी घेतली. बाजारातील तेजीत इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा वाटा होता शेअरने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) $250 अब्ज मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी बनली.बाजारातील तेजीत सगळ्या क्षेत्राचा सहभाग होता. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७०२ अंकांनी वधारून ५७,५२१ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २०७ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १७,२४५चा बंददिला.

शेवटच्या तासातील विक्रीमुळे बाजारात घसरण. Last hour selling drags indices

सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी निफ्टीने मे F&O मालिका तेजीत सुरूझाली आणि दिवसभर सकारात्मक राहिली परंतु शेवटच्या तासात विक्रीमुळे बाजारात घसरण झाली. यूएस अर्थव्यवस्थेत घट आणि आगामी फेड मीटमध्ये दर वाढीच्या अपेक्षेमुळे जागतिक बाजारात विक्रीला चालना मिळाली तसेच पुढील आठवड्यात भारतातील सर्वात मोठा IPO उघडण्यापूर्वी देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४६० अंकांनी घसरून ५७,०६०वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४२ अंकांची घसरण होऊन १७,१०२ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

30 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *