विक्रमी स्तरावरून भांडवली बाजारात (Stock Market) घसरण 

 विक्रमी स्तरावरून भांडवली बाजारात (Stock Market) घसरण 

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली बाजाराने या आठवडयात नवे विक्रमी शिखर सर केले. सेन्सेक्सने प्रथमच ६२,००० चा टप्पा व निफ्टीने १८,६०० टप्पा पार केला.बँक निफ्टीने  ४०,००० पर्यंत मजल घेतली. परंतु या आठवडयात बाजारात नफावसुली पाहावयास मिळाली. गेले काही महिने बाजार  सातत्याने नवी शिखरे सर करत होता. जानेवारी २०२० पासून सेन्सेक्समध्ये जवळपास ४५% हून  अधिक वाढ झाली. आणि जानेवारी २०२१ पासून २६% पेक्षा जास्त वाढ झाली.BSEच्या मार्केट कॅप मध्ये १६०% पेक्षा जास्त वाढ झाली, मार्च २०२० मध्ये रुपये १०२ लाख करोड असणारी मार्केट कॅप(Market Cap) आत्ता जवळ पास रुपये २६६ लाख करोड पर्यंत पोहोचली आहे. रिटेल इन्वेस्टर्स(Retail Investors) ची संख्या व त्यांचा सहभाग दिवसागणिक वाढत चालला आहे. रोज (कामकाजाच्या दिवशी )BSE मध्ये १ लाखाहून अधिक गुंतवणूकदारांच्या नवीन नोंदी होत आहेत.गेल्या एका वर्षात २.६५ करोड नवीन गुंतवणूकदारांची नोंद झाली.या सगळ्याचा परिणाम बाजारावर नव्या शिखरांच्या स्वरूपात जाणवला

परंतु या आठवडयात गुंतवणूकदारानी विक्रीचा मारा केला. बाजाराचे व्हॅल्युएशन वाढल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला.जागतिक बाजारातील नरमाई , कंपन्यांचे  Q2 चे साधारण निकाल, तसेच FIIs ची विक्री, वीकली एक्सपायरी(weekly expiry) व सगळ्यात महत्वाचे चीन व रशियात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झालेली लक्षणीय वाढ या सगळ्याचा प्रभाव जाणवला. येणाऱ्या काळात जागतिक बाजारातील होणाऱ्या घडामोडींकडे बाजाराचे  लक्ष असेल. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी.व खालच्या स्तरावर ऑटो,फार्मा, आय.टी व एफ.एम.सी.जी या क्षेत्रात गुंतवणूक करावी.
मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे सेन्सेक्स ६२,००० च्या जवळ व निफ्टीने १८,५०० चा टप्पा केला पार. Sensex inches closer to 62,000, Nifty crosses 18,500 supported by metal, banks
सोमवारी सलग सातव्या दिवशी बाजाराने पुन्हा तेजी अनुभवली. निफ्टीने १८,५०० चा टप्पा व सेन्सेक्स ६२,००० च्या जवळ पोहोचला. बाजाराने उघडताच नवा विक्रमी स्तर गाठला. बाजाराने क्रूड ऑइल मधील वाढीकडे दुर्लक्ष केले व नव्या विक्रमी स्तराकडे वाटचाल केली.मेटल,बँकिंग क्षेत्रात जबरदस्त तेजी होती. गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येतील घट हे देखील तेजीचे कारण ठरले.फार्मा क्षेत्र वगळता बाकी क्षेत्रात तेजी होती.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५९ अंकांनी वधारून ६१,७६५  या स्तरावर बंद झाला व निफ्टी १३८ अंकांनी वधारून १८,४७७चा बंद दिला.
 
विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण. Market slips from record high
मंगळवारी बाजार action packed होता.सकाळी बाजाराने तेजीचा अनुभव घेतला सेन्सेक्सने प्रथमच ६२,००० चा टप्पा व निफ्टीने १८,६०० टप्पा पार केला. बँक निफ्टीने  ४०,००० पर्यंत मजल घेतली. परंतु नंतर बाजारात प्रचंड नफावसुली झाली. मिडकॅप,स्मालकॅप,मेटल्स,रिअल इस्टेट, FMCG ,ऑटो,बँकिंग ह्या क्षेत्रात घसरण झाली. ITक्षेत्रात तेजी होती. बाजारात पुन्हा खरेदीचा ओघ सुरु झाला बाजार सावरला. परंतु शेवटच्या तासाभरात पुन्हा बाजाराने नफावसुली अनुभवली.
Hindustan Unilever Q2 profit jumps 9% to Rs 2,187 crore, revenue grows at 11.2% Nestle India Q3 Results – profit rises 5% YoY to Rs 617 crore, revenue comes in at Rs 3,883 crore.
सलग दुसऱ्या दिवशी नफावसुली निफ्टी १८३०० च्या खाली. Profit-booking drags Nifty below 18,300
सलग दुसऱ्या दिवशी,वीकली एक्सपायरीच्या अगोदर  म्हणजेच बुधवारी बाजारात पुन्हा नफावसुली पाहावयास मिळालाय बाजाराची सुरुवात समाधानकारक झाली परंतु गेल्या काही दिवसात काही शेअर्समध्ये तुफान तेजी झाली होती खास करून मिडकॅप आणि स्मालकॅप शेअर्स मध्ये त्यात जोरदार नफावसुली झाली.रिअल इस्टेट,मेटल या क्षेत्रात जबरदस्त नफावसुलीचे चित्र दिसले ,ऑटो,फार्मा,FMCG ,आय.टी यात दबाव होता. या करेक्शनचा बाजाराला फायदा होईल व काही शेअर्स मध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी मिळेल अशी गुंतवणूकदारांची धारणा होती.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५६ अंकांनी घसरून  ६१,२५९  या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५२  अंकांनी घसरून १८,२६६चा बंद दिला.ITC corrects 6% after 26% rally.
सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स व निफ्टी खालच्या स्तरावरती बंद.   Sensex, Nifty Close Lower For Third Day.
गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली सुरूच राहिली, सकाळच्या समाधानकारक सुरुवातीनंतर पुन्हा एकदा बाजारात विक्रीचा मारा सुरु झाला मेटल व आय.टी क्षेत्रातील नफावसुलीमुळे बाजार चांगलाच घसरला,गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारानी विक्री करणे पसंत केले.शेवटच्या तासभर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. बाजाराचे व्हॅल्युएशन सुद्धा फार वाढले असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला. दिवसभरात सेन्सेक्स ७०० अंकांपेक्षा अधिक घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३३६ अंकांनी घसरून  ६०,९२३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८८ अंकांनी घसरून १८,१७८चा बंद दिला.
India crossed the 1 billion Covid-19 vaccine dose milestone on Thursday.
Sensex, Nifty Erase All Early Gains, Slips Into Red In Late Deals.
सलग चवथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बाजाराने पुन्हा नफावसुली अनुभवली.बाजाराची सुरुवात मजबूत झाली. परंतु चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने तेथे शाळा ,कॉलेज बंद करण्यात आली तसेच विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. रशियातही कोरोनाने डोके वर काढल्याने तेथेही नवे निर्बंध लादण्यात आले.ह्यामुळे बाजाराची मनस्थिती बिघडली व  गुंतवणूकदारानी विक्री करणे पसंत केले. निफ्टी  १८,१०० च्या वरती बंद होण्यात यशस्वी झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरून  ६०,८२१ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६३ अंकांनी घसरून १८,११४चा बंद दिला. the stock market
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com  
ML/KA/PGB
23 Oct 2021

mmc

Related post