रमजानसाठी या राज्य सरकारने केला कार्यालयीन वेळेत बदल

 रमजानसाठी या राज्य सरकारने केला कार्यालयीन वेळेत बदल

लखनऊ,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ मार्च पासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या नितीश कुमार सरकारने मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एक परिपत्रक जारी करून मुस्लिम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रमजानमध्ये नियोजित वेळेच्या एक तास आधी कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे.

त्याचबरोबर त्यांना नियोजित वेळेच्या एक तास आधी कार्यालयातून बाहेरही पडता येणार आहे. म्हणजेच नियोजित वेळेच्या एक तास आधी त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला. या आदेशामागील मुख्य कारण म्हणजे कामावर परिणाम होऊ नये. जर मुस्लिम कर्मचारी आणि अधिकारी रमजानमध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास आधी कार्यालयात आले तर त्यांच्या नियोजित वेळेपूर्वी निघून जाण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते नियोजित वेळेपूर्वी येऊन काम पूर्ण करू शकतील.मात्र या वरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

नितीश सरकारच्या या आदेशावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. सीएम नितीश यांनी मुस्लिम मतदारांच्या मदतीसाठी हा निर्णय घेतला आहे. चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अशीच परिपत्रके जारी करावीत, अशी मागणी भाजप नेते अरविंद कुमार सिंह यांनी केली आहे. मात्र, आरजेडी आणि जेडीयूने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

SL/AK/SL

18 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *