आठवड्याच्या शेवटी तेजी , सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

 आठवड्याच्या शेवटी तेजी , सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

जगभरातील बाजारांसाठी गेला संपूर्ण आठवडा वेगवान घडामोडींचा ठरला २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे जगभरातील बाजार प्रचंड घसरले. हा दिवस दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातील ‘काळा दिवस” ठरला. युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळाले.गुरुवारी भारतीय बाजाराच्या निर्देशांकांनी जवळपास दोन वर्षातील त्यांची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली. कच्च्या तेलाच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव १०२ डॉलर प्रति बॅरल गेला याचाही फटका बाजाराला बसला.विदेशी गुंतवणूकदारानी सुद्धा (FIIs)मोठ्या प्रमाणात विक्री केली. FIIs pull out more than $29 bn in FY22 amid high valuations, US Fed rate hike fears, geopolitical tensions

परंतु सात दिवसांच्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. जागतिक बाजारातील तेजी व अमेरिकेने रशियावर प्रतिबंध लावून देखील रशियाच्या ऑइल एक्सपोर्टवर काहीही परिणाम होणार नसल्याने व स्विफ्ट ग्लोबल पेमेंट नेटवर्कच्या प्रवेशास काहीही अडथळा नसल्याने जागतिक बाजारांनी सुटकेचा निश्वास सोडला व बाजार वधारले बाजार ओव्हरसोल्ड असल्याने चांगलेच रिकवर झाले.
येणारा आठवडा हा महत्वाचा आहे गुंतवणूकदारांचे लक्ष रशिया व युक्रेन मधील परिस्थती.सोमवारी भारताचे Q3 GDP चे जाहीर होणारेआकडे .मंगळवारी US Manufacturing PMIचा डेटा .शुक्रवारी US February non farm payroll data यावर असेल. मंगळवारी महाशिवरात्री निमित्त भारतीय बाजार बंद राहतील.

शुक्रवारी अमेरिकन बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स ८३४ अंकांनी वधारला. याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसेल.अमेरिकेने आपले सैन्य न पाठविल्याने बाजाराचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हरसोल्ड असल्याने (Oversold market) बाजारात रिकवरी होईल.निफ्टीने या आठवड्यात १६,२०० च्या जवळ स्तर गाठला. या स्तराजवळ बाजार आपला बॉटम करेल काही विपरीत बातमी आली तर निफ्टी १५,९००चा स्तर गाठू शकते. बाजारात चढउताराचे प्रमाण जास्त असल्याने गुंतवणूकदारानी अत्यंत सावध पवित्र घ्यावा व संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.

सलग चवथ्या दिवशी बाजारात घसरण

The market fell for the fourth day in a row
सलग चवथ्या दिवशी व आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रचंड चढ उतार दिसला. जागतिक बाजारातील कमजोरी व युक्रेनवरील संकटाची अनिश्चितता यामुळे बाजार घसरले.सकाळच्या सकारात्मक सुरुवातीनंतर वरच्या स्तरावरून बाजरावर दबाव वाढला. गुंतवणूकदारानी नफावसुली केल्याने बाजार खालच्या पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४९ अंकांनी घसरून ५७,६८३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६९ अंकांनी घसरून१७,२०६चा बंददिला. Markets end lower for the fourth consecutive session amid volatility on the back of Ukraine crisis.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजार सलग पाचव्या सत्रात घसरला.Markets end lower for the fifth consecutive session amid weak global cues
सलग पाचव्या दिवशी बाजारात अफ़रातफ़रीचा माहोल होता.बाजरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला. युक्रेन व रशिया या दोन देशातील तणाव वाढल्याने जागतिक बाजार जोरदार गडगडले या तणावाचा असर कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ९८ डॉलर प्रति बॅरल गेल्याने भांडवली बाजारात जोरदार विक्री झाली. जगभरात ९ लाख बॅरल दिवसाचा तुटवडा जाणवत होता.रशिया व अमेरिका यांच्याकडून जाहीर होणाऱ्या प्रत्येक बातमीने बाजारावर परिणाम होताना दिसत होता. सुरुवातीच्या घसरणीनंतर अखेर बाजार सावरला. निफ्टीने १७,००० च्या वर बंद भाव देण्यात यश मिळवले. निफ्टी तळापासून २५० अंकांनी सुधारला, तर सेन्सेक्स ९५० अंकांनी वाढला.पॉवर वगळता सर्व क्षेत्र निर्देशांक घसरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८२ अंकांनी घसरून ५७,३०० या स्तरावर बंद झाला व निफ्टी ११४ अंकांनी घसरून१७,०९२ चा बंददिला.

रशिया व युक्रेन तणावामुळे बाजाराचे मनस्वास्थ्य बिघडले.Market ends lower as Russia-Ukraine tensions weigh on sentiment
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजाराची सुरुवात समाधानकारक झाली. परंतु शेवटच्या तासात झालेल्या नफावसुलीमुळे बाजार खाली आले. आंतरराष्ट्रीय देशातील तणावामुळे बाजारात चढउतार हे बुधवारी देखील सुरूच होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६८ अंकांनी घसरून ५७,२३२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २८ अंकांनी घसरून१७,०६३चा बंददिला.

२४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सलग सातव्या सत्रात भारतीय भांडवली बाजाराच्या निर्देशांकांनी जवळपास दोन वर्षातील त्यांची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली, हा दिवस दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातील ‘काळा दिवस” ठरला.संपूर्ण जगभरातील बाजारात कोहराम माजला.सेन्सेक्स मध्ये जवळपास २८०० अंकांची घसरण झाली. या घटनेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव १०२ डॉलर प्रति बॅरल गेला. निफ्टीतील ५० कंपन्यांचे शेअर्स खालच्या स्तरावर बंद झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स २,७०२ अंकांनी घसरून ५४,५२९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८१५ अंकांनी घसरून१६,२४८ चा बंददिला.the Sensex rose by 1,300 points

सलग सात दिवसांच्या घसरणीला लागला ब्रेक. Market snaps 7-day losing streak
सलग सात दिवसांच्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. जागतिक बाजारातील तेजी व अमेरिकेने रशियावर नवीन प्रतिबंध लावून देखील रशियाच्या ऑइल एक्सपोर्टवर काहीही परिणाम होणार नसल्याने व स्विफ्ट ग्लोबल पेमेंट नेटवर्कच्या प्रवेशास काहीही अडथळा नसल्याने जागतिक बाजारांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारतीय बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे १६००व ५०० अंकांनी वाढले.बाजार ओव्हरसोल्ड असल्याने चांगलेच रिकवर झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १,३२८ अंकांनी वधारून ५५,८५८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४१० अंकांनी वधारून १६,६५८ चा बंददिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

26 Feb 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *