आळंदी ते पंढरपूर वारी मार्ग खचला
सोलापूर,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीची वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना वारी मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. पंढरपूरची वारी जाणारा नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.पंढरीची वारी सुखकर व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर असा हजारो कोटी रुपये खर्च करून मार्ग नव्याने तयार करण्यात आला होता. पण माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले ते वेळापूर दरम्यान २०० मीटर रस्ता ६० फूट खोल खचला आहे.
सदर काम गुणवत्ता पूर्ण न झाल्याने हजारो कोटी रुपये खर्च करून केलेला पालखी मार्ग खचला आहे. त्यामुळे या मार्गाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाल्याने मागील वर्षीची वारी या मार्गावरून गेली होती. आता महिनाभरावर आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वीच या मार्गावरून पुढील काही दिवसात वारी जाणार आहे. त्या पूर्वी हा खचलेला रास्ता तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.
SL/ML/SL
14 June 2024