विधान परिषदेमध्ये विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार….

 विधान परिषदेमध्ये विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार….

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्री गिरीश महाजनांवर होत असलेल्या आरोपासंदर्भात मांडल्या गेलेल्या मुद्या संदर्भात सरकारच्या वतीने विधान परिषदेत निवेदन करण्यात आले मात्र बोलू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण २०१७-१८ मधील आहे. नाशिक येथील शहर ए खतीब चा खिताब असणाऱ्या मुस्लिम समाजातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाचा विवाह सोहळा होता. त्यांच्या किंवा मुलीकडील कुणाचाही संबंध दाऊदशी नव्हता. केवळ मुलीकडील एका नातेवाईकाचे लग्न दाऊदशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत झाला होता.

बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचला त्यावर विरोधक बोलत नाही असे फडणवीस म्हणाले . यावेळी उद्धव ठाकरे सभागृहात असल्यामुळे विरोधकांनी जोरकसपणे मंत्र्यावर आरोप लावले गेले. यापूर्वीच या प्रकरणाची चौकशी झाली आहे. संबंधित मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग आढळला नाही. असे बेछूट आरोप केल्याबद्दल आरोप करणाऱ्यांनी माफी मागीतली पाहिजे, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.

फडणवीस सभागृहातून निघून जात असताना अंबादास दानवे यांनी या विषयावर म्हणणे मांडू देण्यासाठी हात वर केला. वारंवार मागणी करूनही बोलण्याची संधी मिळत नसल्याने, अनिल परब उभे राहिले. त्यानंतर विरोधी बाकावरील अनेक सदस्य सभागृहातून बाहेर निघून गेले. सभागृहात विरोधकांना बोलूच दिले जात नाही. एकतर्फी कामकाज चालविले जात असल्याचा आरोप अनिल परब आणि इतरांनी सभागृहात केला. बोलूच दिले जात नसल्याने कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे दानवे यांनी सांगत विरोधक सभागृहातून निघून गेले.The opposition boycotted the work in the legislative council.

ML/KA/PGB
18 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *