भांडवली बाजाराने (Stock Market) गाठले विक्रमी शिखर निफ्टीने १६,००० व सेन्सेक्सने ५४,००० चा टप्पा केला पार.

 भांडवली बाजाराने (Stock Market) गाठले विक्रमी शिखर निफ्टीने १६,००० व सेन्सेक्सने ५४,००० चा टप्पा केला पार.

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारात तेजीचा माहोल होता.बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. बाजारावर जीएसटी कर वसुली(GST collection) ,पीएमआय(PMI) आकडे ,आरबीआय पॉलिसी(RBI Policy),तिमाही निकाल(Quarterly results) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी. The market was bullish this week. The market set a new record.

 

The greatest Enemies of the Equity investor are Expenses and Emotions.” — Warren Buffett

 

बुल्स पुन्हा बाजारात दाखल झाल्याने बाजारात तेजी. Bulls returned to Dalal Street, pulling benchmark indices higher.

आठवडयाची सुरुवात दमदार झाली आयटी, ऑटो,आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीमुळे बाजारात तेजीचा माहोल होता.जागतिक बाजारात देखील तेजी होती. निफ्टीने १५,९०० चा स्तर तोडण्याचाप्रयत्न केला.रिअल इस्टेट निर्देशांक 11 वर्षांच्या उच्चांकावर बंद झाला. जुलैमध्ये जीएसटी कर वसुलीमध्ये  (GST collection )३३% वाढ झाल्यामुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढला.दिवसभरातील कामकाजात  Shree Cements, Titan Company, BPCL, Grasim Industries आणि Eicher Motors ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व UPL,TATA STEEL,BAJAJ FINSERV आणि  BAJAJ FINANCE ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६३.७९ अंकांनी वधारून ५२,९५० या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२२ अंकांनी  वधारून  १५,८८५  चा बंद दिला.

सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर.निफ्टीने प्रथमच गाठला १६००० चा टप्पा. Nifty Closes Above 16,000 For First Time; Sensex At Record High.

जागतिक बाजारात संमिश्र संकेत असून देखील  मंगळवारचा दिवस बाजारासाठी ऐतिहासिक ठरला.  सेन्सेक्स व निफ्टी या दोघांनीही नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात यश मिळवले, निफ्टीने १६०००ची Psychological पातळी तोडली. ५ फेब्रुवारीला निफ्टीने पहिल्यांदा १५००० ची पातळी गाठली. तेव्हापासून, त्याने १६००० ची पातळी अनेक वेळा तोडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या पातळीवर पोहोचल्यानंतर निफ्टी वर दबाव येत असे. परंतु मंगळवारी हा  स्तर पार करण्यात निफ्टीला यश मिळाले. निफ्टीने  १६,१४६ आणि सेन्सेक्सने  ५३,८८७ चा उच्चतम स्तर गाठला. टेलिकॉम(elecom,), एफएमसीजी(FMCG), ऑटो(auto), बँका( banks) आणि आयटी(IT ) समभागांमध्ये खरेदी दिसून आली. धातू(Metal)) क्षेत्रात  थोडा दबाव होता.बाजारावर बुल्सची(Bulls) पकड होती. सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला..बाजार बंद होताना सेन्सेक्स ८७२.७३ अंकांनी वधारून ५३८२३.३६या स्तरावर बंद झाला व निफ्टी २४५. ६०अंकांनी  वधारून  १६१३०.७५ चा बंद दिला. Healthy buying in most sectors pushed markets to record high levels in the intraday trade.

सेन्सेक्स प्रथमच ५४,०००च्या वर बंद झाला व निफ्टीने मंगळवारच्या विक्रमात घातली भर. Sensex Closes Above 54,000 For First Time; Nifty Extends Record.

जागतिक बाजारात संमिश्र संकेत असून सुद्धा बुधवारी बाजाराची सुरुवात मजबूत झाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजाराने पुन्हा नवीन विक्रम प्रस्थापित केला. बाजारात प्रचंड जोश होता. सेन्सेक्सने ५४,००० चा टप्पा गाठून विक्रम नोंदवला ५३,०००ते ५४,००० पर्यंतचा टप्पा ३० सत्रात पार केला.बुधवारी बाजाराच्या वाढीकरिता बँकिंग आणि वित्तीय समभागांचे  महत्त्वपूर्ण योगदान राहिले.जीएसटी कलेक्शन, पीएमआय उत्पादन,तिमाही निकाल यामध्ये हळूहळू होत असलेला सुधार बाजाराच्या तेजीकरिता कारणीभूत ठरले.दिवसभरातील कामकाजात HDFC, Kotak Mahindra Bank, ICICI Bank, HDFC Bank  आणि SBI  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  Grasim, Titan Company, Tata Motors, Hindalco आणि Adani Ports  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स ५४६.४१ अंकांनी वधारून ५४,३६९.७७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२८अंकांनी  वधारून  १६,२५८ चा बंद दिला

दिवसभरातील चढ उतारानंतर बाजाराने दिला सकारात्मक बंद. Markets end in the positive territory amidst volatility.

गुरुवारी चांगल्या ग्लोबल संकेतामुळे वीकली एक्सपायरीच्या दिवशी  भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत झाली.  बाजाराने  नवीन विक्रम नोंदवला व यात IT क्षेत्राचा हातभार होता. सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर  भारतीय बाजार थोडा सुस्त झाला.दिवसभरातील कामकाजात Bharti Airtel, Eicher Motors, ITC, Tech Mahindra  आणि Tata Stee  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व SBI, IndusInd Bank, ICICI Bank, Bajaj Finance आणि Bajaj Finserv  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १२३ अंकांनी वधारून ५४,४९२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३५ अंकांनी  वधारून  १६,२९४ चा बंद दिला. Sensex, Nifty close at a record high ahead of RBI MPC meet.

आरबीआयने व्याजदर जैसे तेच ठेऊनही बाजार घसरलाSensex, Nifty end lower even as RBI keeps rates unchanged.

संमिश्र जागतिक संकेत व आरबीआय पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. सलग तीन दिवसांच्या विक्रमी तेजीनंतर बाजाराने थोडी विश्रांती घेतली.रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात गव्हर्नर शंकिकांत दास यांनी व्याजदर स्थिर ठेवले असल्याचे जाहीर केले. आरबीआयने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला.  बाजारात काही काळाकरिता तेजी पसरली.परंतु बाजार बंद होईपर्यंत बाजारात दबाव होता..दिवसभरातील कामकाजात IndusInd Bank, Adani Ports, IOC, Bharti Airtel आणि  Tata Consumer Products  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Cipla, Reliance Industries, Shree Cements, UltraTech Cement आणि  SBI  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरून  ५४,२७८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५६ अंकांनी  घसरून १६,२३८ चा बंद दिला.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

The Nifty hit a record high of 16,000 and the Sensex crossed the 54,000 level.
JS/KA/PGB
7 Aug 2021
 

mmc

Related post