पोर्ट ब्लेअरचे नाव आता श्री विजयपुरम, अमित शहा यांनी केली घोषणा

 पोर्ट ब्लेअरचे नाव आता श्री विजयपुरम, अमित शहा यांनी केली घोषणा

अंदमान-निकोबार बेटांवर असलेल्या पोर्ट ब्लेअर या बेटाचं नावही सरकारनं बदललं आहे. यासाठी नवं भारतीय नाव सुचवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्विटद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. अमित शाह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”. त्यानुसार आता पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजयपुरम असे असणार आहे. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर (Archibald Blair) यांच्या सन्मानार्थ या बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर असं ठेवलं होतं, जे आता मोदी सरकारने बदललं आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *