पंतप्रधान आवास योजनेतून मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या शंभर वर्षांपासून अधिक काळ मुंबईतील गर्दी, पाऊस यांची तमा न बाळगता जेवणाचे डब्बे वेळेवप पोहोचवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून डबेवाल्यांना घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये मुंबईत ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असो. चे अशोक गायकवाड महाराज आदि उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतर आता पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरं दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मुंबईत १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. याच्या माध्यमातून डबेबाल्यांना लवकरच मुंबईत हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने आज देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला.
मुंबईच्या डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनाही या योजनेत घरं दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार आहे. तर नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर या घरांचं बांधकाम करणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. येत्या ३ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
SL/ML/SL
13 Sept 2024