दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला झाला नाही, पुढेही होणार नाही

 दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला झाला नाही, पुढेही होणार नाही

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहा टक्के आरक्षण टिकणार नसून त्या दहा टक्के आरक्षणाचा आमच्या लेकरांना आतापर्यंत उपयोग झाला नसल्याचं मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. 4/2 ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून कोरोडो मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळे सरकारने वेगळे आरक्षण देऊन करू नये असं मी सरकारला आधीच म्हटलो होतो. मात्र या दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला झाला नसून पुढेही होणार नसत्याच जरांगे म्हणालेत. हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटीत ही प्रतिक्रिया दिली आहे.

जर हे आरक्षण टिकले तर पोरांचं चांगलं होईल नसता वाटोळे होईल असे म्हणत 10 टक्के आरक्षणाचा लाभ
आजही काही मुलांना घेता येत नसल्याचं जरांगे म्हणाले. काही मुलांची ओरड आहे आम्हाला त्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, जिल्हाधिकारी, तहसीलदार वेगळेच सांगतात उपविभागीय अधिकारी त्यापेक्षाही वेगळे सांगतात , असं म्हणत महसूल कार्यालयातून प्रमाणपत्र दिलं जात नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे बारकाईने लक्ष पाहिजे मात्र मराठा समाजाचे लोक कसे अडकवता येतील त्यांच्यावर खोटे केसेस कसे दाखल करता येतील याच्यात त्यांचा वेळ चालला असल्याची टीका जरांगे यांनी केली. जे प्रमाणपत्र निघणार आहेत, ज्या नोंदणी सापडल्यात त्या ताबडतोब द्या हे निर्देश ते देत नाही, दहा टक्के आरक्षणाचा नोकर भरतीत पोरांना उपयोग होईल हे काम ते करत नसून नुसती मजा बघतात अशी टीका जरांगे यांनी केली. न्यायालयाने आता पुढचा निर्णय दिला असून आता काय होईल ते होईल असं म्हणत जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.The Maratha community has not benefited from the ten percent reservation

ML/ML/PGB
17 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *