‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

 ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, 21 जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

The mantra of nature conservation will be given from the movie ‘Zhad’

ML/ML/PGB
15 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *