सहकारी पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसुलीचा मुद्दा गंभीर
केतन खेडेकर, दि. १५ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष – 2025, सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच फेडरेशनचे मुखपत्र “पतसंस्था परिवार” याच्या रौप्य महोत्सवी विशेष स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळा दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात भव्य उत्साहात संपन्न झाला.सभागृहात नागरी सहकारी पतसंस्था प्रतिनिधींची प्रभावी उपस्थिती होती. फेडरेशन अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांचे प्रभावी प्रास्ताविक फेडरेशनचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव नलावडे यांनी आपल्या प्रभावी प्रास्तविकामध्ये राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना भेडसावणाऱ्या थकीत कर्ज वसुलीच्या गंभीर अडचणींचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडला.“राज्यात सहकार चळवळ सक्षम करायची असेल तर पतसंस्थांसाठी स्वतंत्र कर्ज वसुली प्राधिकरण तातडीने स्थापन करणे अपरिहार्य आहे. शासनाने या प्रश्नाला तातडीने न्याय द्यावा.” नलावडे यांनी कोविड काळातील घटती वसुली, ऑटोरिक्षा–टॅक्सी परवान्यांच्या मुक्त परवान्यांमुळे झालेली आर्थिक ढासळण, आणि सद्यस्थितीतील कायदेशीर अडथळ्यांचा सविस्तर उल्लेख केला. प्रवीणभाऊ दरेकर यांची तत्काळ सकारात्मक प्रतिक्रिया आली असून त्यांनी या मुद्द्याला प्रतिसाद देताना मुंबई बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष ना. प्रवीणभाऊ दरेकर
यांनी मंचावरून महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की “पतसंस्थांच्या वसुली प्रश्नावर मी येत्या अधिवेशनात आवाज उठवीन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार मंत्री यांच्यासोबत ताबडतोब चर्चा करण्यात येईल. या प्रश्नाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.”सभागृहात या घोषणेला उपस्थित नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. या समारंभाला राज्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री. सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष – मुंबई बँक, श्री. विद्याधर अनास्कर, प्रशासक – महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक, मुंबई बँकेचे सर्व संचालक, फेडरेशन संलग्न संस्थांचे अध्यक्ष व संचालक, सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.