विधानपरिषद निवडणूकीत महायुतीच सरस
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या ९ तर महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला यामुळे दोन वर्षांपूर्वी महायुतीने मिळवलेला विजय यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या एकत्रित योजनेचा परिणाम ठरला आहे.
आज झालेल्या मतदानात विधानसभेच्या एकूण २७४ आमदारांनी मतदान केले. महायुतीच्या वतीने उभे असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे , परिणय फुके , योगेश टिळेकर आणि अमित गोरखे हे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या २६ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाले. तर भाजपाचे पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीची २३ मतं घेऊन विजयी झाले.
शिवसेनेकडून भावना गवळी यांनी पहिल्या पसंतीची २४ आणि कृपाल तुमाने यांनी २५ मतं मिळवत विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेवसचे राजेश विटेकर २३ आणि शिवाजीरावर गर्जे पहिल्या पसंती क्रमाची २४ मतं घेऊन विजयी झाले.
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यासाठी २५ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता,पहिल्या पसंतीक्रमातच हा कोटा पूर्ण करत त्या विजयी झाल्या. शेवटी झालेल्या चुरशीच्या लढतीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली. मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीक्रमाची २२ मत मिळवत विजयी झाले. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित जयंत पाटील यांना केवळ १२ मतं मिळाली . गेली अनेक वर्षे शेकापचं विधानसभेत कमी संख्याबळ असूनही जयंत पाटील विधानपरिषदेवर निवडून येत होते. यावेळी मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षातील मतं त्यांना मिळाली नाहीत त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यामुळे अजित पवार गटात नाराज असणारे आमदार फुटतील , भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव होऊ शकतो अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा आहे. गेल्या वेळी देखील काँग्रेसची मते फुटली होती. या वेळी एक मत बाद म्हणजे अवैध ठरले आहे, ते कोणाचे यावर मात्र चर्चा रंगली आहे The Grand Alliance is the best in the Legislative Council elections
ML/ML/PGB
12 July 2024