विचार, विश्वास आणि विकास हीच सरकारची त्रिसूत्री
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल , आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे, वेगवान निर्णय घेतले यासाठी विचार , विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते.
विरोधक पूर्वी बाहेरून सरकारला शिव्या देत होते , आता सभागृहात देऊ लागले आहेत, हे दुर्दैव आहे असं ते म्हणाले. विरोधकांनी आपल्याच राज्याची बदनामी करू नये, इथले उद्योग राज्याबाहेर गेलेले नाहीत , गेल्या दोन वर्षांत एकूण २४२ मोठे उद्योग राज्यात येत आहेत. एकूण दोन लाख हजारांहून अधिक ची गुंतवणूक राज्यात होते आहे त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होत आहे असं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून सरकारने माहेरचा आहेर दिला आहे. एक जुलै पासून ही योजना लागू करण्यात आली आहे, अर्जदार केव्हाही या योजनेत सहभागी झाला तरी त्याला पूर्वलक्षी प्रभावाने पैसे देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ असं केलं आहे आणि जमिनीची अट ही काढून टाकली आहे असं ते म्हणाले.मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी सरकार देत आहे, त्यांची फी सरकार भरणार आहे. तरुणांनाही दहा हजार महिना प्रशिक्षण रक्कम दिली जाणार आहे, यासाठी आवश्यक निधी उभारला जाईल , इच्छा असेल तर मार्ग निघतो असं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.
ML/ML/SL
2 July 2024