‘सोनसावली’ने होणार अन्नसाखळी सुरळीत! ‘पर्यावरण वारी’

 ‘सोनसावली’ने होणार अन्नसाखळी सुरळीत! ‘पर्यावरण वारी’

जळगाव, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तालुक्यातील आवार गावात बुधवारी (दि. 5) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण वारी’ कार्यक्रम घेण्यात आला. सोनसावळी प्रकल्पाचा एक भाग म्हणून माय माती फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आवार ग्रामपंचायतीच्या हद्दीत 100 गुंठे जागेवर सध्या 2,000 झाडांचे घनदाट जंगल उभारले जात आहे. या उपक्रमाला सोनसावळी प्रकल्प असे संबोधले जाते. प्रियवारीच्या वेळी संपूर्ण गावातून पाणी गोळा करून अमृत कलश भरण्यात आला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी त्यांनी आणलेल्या पाण्याने अमृत कलश भरून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रगती सपकाळे, यशश्री सोनवणे, जागृती चौधरी, देविदास कोळी या विद्यार्थिनींनी पर्यावरणाचे महत्त्व विषद केले.

डॉ. उषा शर्मा, छाया पाटील, सुजाता देशपांडे, वैदेही नाखरे, प्रियल जैन, सीए गौरव जैन, गायत्री फिरके, सीए वीरेंद्र फिरके, अनिता कांकरिया, लता बनवट, ॲड. रेश्मा बेहरानी, अर्चना जाखेटे, पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ, कविता नेमाडे, अनिता दलाल, स्मिता वडनेरे, भानुदास जोशी, किशोर पाटील, केतन पाटील, शेखर हनवदे, मिलिंद पाटील, विशाल अलकारी आदी या उपक्रमात सहभागी झाले.
अन्नसाखळी सुरळीत होणार
माय माती फाउंडेशन आणि आवार ग्रामपंचायतीतर्फे सोनसावली प्रकल्प ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीरित्या साकारला जात आहे. ‘सोनसावली’मुळे तुटलेली अन्नसाखळी पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होत आहे व आजूबाजूच्या गावांमध्ये यामुळे पर्यावरणाप्रती जनजागृती होऊन अशाप्रकारचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा पाहुण्यांनी व्यक्त केली.

The food chain will be smooth with ‘Sonsavali’! ‘Environment Wari’

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *