या आहेत लालपरीच्या पहिल्या महिला ड्रायव्हर

पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाल परी म्हणून ओळख असलेली राज्य परिवहन महामार्गाची बस सेवेने नुकतीच ७५ वर्ष पूर्ण केली.राज्यातील सामन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे.अर्चना आत्राम असे या महिल्या महिल्या ST ड्रायव्हरचे नाव आहे.यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.
चाकणकर यांनी महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. “नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!”
SL/KA/SL
9 June 2023