कमी वेळात सर्वांधिक कमाई करणारी पहिली Animation Film

 कमी वेळात सर्वांधिक कमाई करणारी पहिली Animation Film

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘इन्साईड आऊट – 2 (Inside Out 2) हा ऍनिमेशनपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘इन्साईड आऊट-2’ चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने केवळ 3 आठवड्यांहून कमी कालावधीत जगभरातून १०० कोटींची डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत १०० कोटी कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट होणारा ‘इन्साईड आऊट 2’ हा एकमेव अॅनिमेटेड चित्रपट ठरला आहे. ‘Inside Out 2’ has become the only animated film to be included in the films to earn 100 crores in a short period of time.

या या चित्रपटाने भारतातही उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटाने भारतात केवळ 19 दिवसात 101.48 कोटींची (12.7 दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आहे. भारतातही सर्वात जलद गतीने 100 कोटी कमावणाऱ्या अॅनिमेशन चित्रपटांच्या यादीत इन्साईड आऊट-2 या चित्रपटाने वरचा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारतात 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील 11 पैकी 8 चित्रपट डिस्ने आणि पिक्सरचे आहेत.

इन्साईड आऊट – 2 या चित्रपटातील पात्रांच्या भावनिक प्रवासाने जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं. मानवी भावनांचे प्रतिनिधित्व करणारी पात्र सादर करून आपल्या अंतर्मनातील जगात सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या खोलवर जात या चित्रपटाने बच्चे कंपनीसह सगळ्यांना वेड लावलं. या चित्रपटाला समीक्षकांचीही चांगली दाद मिळाली आहे. केल्सी मॅन यांनी दिग्दर्शित केलेला इन्साईड आऊट 2 हा चित्रपट 14 जून 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. Directed by Kelsey Mann, Inside Out 2 is slated to hit theaters worldwide on June 14, 2024. मेग लेफोव यांनी लेखन केलेल्या या अॅनिमेटेड चित्रपटाने भारतातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठी कामाई केली आहे.

SL/ML/SL

3 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *