जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचा स्फोट
टेक्सास, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला. सायंकाळी 7 च्या सुमारास टेक्सासच्या बोका चिकाहून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. जगातील सर्वात ताकदवान लाँच व्हेईकल स्टारशिप आपल्या ऑर्बिटल टेस्टसाठी सज्ज होते. हा स्टारशिपच्या ऑर्बिटल लाँचिंगचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात प्रेशर व्हॉल्व फ्रीज झाल्यामुळे अवघ्या 39 सेकंद अगोदर प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. स्टारशिपचे आकाशात झाले तुकडे, याचे उड्डाणच होणे हेच मोठे यश असल्याचे स्पेसएक्सने म्हटले आहे.
स्टेनलेस स्टीलचे स्टारशिप जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने तयार केले आहे. हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कारण, केवळ हेच अंतराळयान मानवाला आंतरग्रहीय म्हणजे इंटरप्लॅनेटरी बनवेल. स्टारशिपच्या मदतीने प्रथमच माणूस पृथ्वीशिवाय अन्य ग्रहावर पाऊल ठेवेल. मस्क यांची 2029 पर्यंत मंगळ ग्रहावर मानवी वस्ती स्थापन करण्याची महत्त्वकांक्षा आहे. हे स्पेसशिप माणसांना एका तासापेक्षा कमी वेळेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवण्यास सक्षम असेल.
SL/KA/SL
20 April 2023