तीन राज्यांमधील पराभवामुळे विरोधकांना धडकी भरली आहे
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ आणि परिसरातील प्रश्नांना या अधिवेशनात न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देश मोदींच्या मागे असल्याचे नुकतेच दाखवून दिले आहे, राज्यातही हीच स्थिती असेल , शासन आपल्या दारी कार्यक्रमातून दोन कोटी लोकांना मदत मिळाली आहे, हा इव्हेंट नाही लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे हे चित्र पहिल्यांदाच पाहत आहोत असे आज पत्रकार परिषदेत सांगितले, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही पत्रकार परिषद झाली.
कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण आम्ही देऊ , कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका आमची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला विचारू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू असं मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या अहंकारामुळे राज्यातील प्रकल्प ज्यांनी बंद पाडले, केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केलाच नाही ते म्हणतात आम्ही दिल्लीत वारंवार जातो असा आरोप करत आहेत , आम्ही दिल्लीत पाठपुरावा करून लोकांसाठी निधी आणतो असं मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधी पक्षाला विदर्भ , मराठवाडा येथील प्रश्नांबाबत आस्थाच नाही , त्यामुळे त्यांचा या चहापानावर बहिष्कार टाकला आहे , हे अधिवेशन या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असते , मात्र त्यांना चर्चाच करायची नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी पत्रकार परिषद सुरू करताना म्हटले
Ncrb चा अहवाल विरोधकांना वाचताच येत नाही. नागपुरातच अधिवेशन घेणं टाळलं ते आता अधिवेशनाच्या कालावधी वर बोलताहेत असे सांगत फडणवीस यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचे प्रमाण बघायचे आहे, त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती चुकीची आहे असे स्पष्ट केले .
दुष्काळ , अवकाळी यामुळे झालेल्या नुकसानीला योग्य न्याय या अधिवेशनात देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ८० हजार कोटींचे कर्ज काढण्याची सरकारची तयारी आहे , त्यापैकी ५३ हजार कोटी आधीचे कर्ज आणि त्यावरील व्याज यात जाईल , केंद्राच्या निकषाप्रमाणे कर्जाचे प्रमाण १८.२३ टक्के इतकेच असून ते मर्यादेत आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत हे योग्यच आहे असे ते म्हणाले.
ML/KA/SL
6 Dec. 2023