उद्या देशाला मिळणार ३ नवीन IIM, ४ IIT-IIS आणि २० केंद्रीय विद्यालये

 उद्या देशाला मिळणार ३ नवीन IIM, ४ IIT-IIS आणि २० केंद्रीय विद्यालये

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जम्मू मध्ये ३० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करतील. यामध्ये जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताला जोडणारी उधमपूर-बनिहाल रेल्वेमार्गाचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक सामील आहे. देशातील शिक्षण व कौशल्या विकासाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल आहे. पीएम मोदी जवळपास १३ हजार ३७५ कोटी रुपयांच्या योजना राष्ट्राला समर्पित करतील तसेच भूमिपूजन करतील. यामध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) भिलाई, आयआयटी तिरुपती, IIT जम्मू, भारतीय सूचना प्रौद्योगिकी, डिजाइन व निर्माण संस्थान (आयआयआयटीडीएम) कांचीपूरम परिसराचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे २ कॅम्पस देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) मध्ये स्थापित केले गेले आहेत.

पंतप्रधान मोदी देशात तीन नवीन भारतीय व्यवस्थापन संस्थान (IIM) म्हणजेच आयआयएम जम्मू, आयआयएम बोधगया आणि आयआयएम विशाखापत्तटमचे उद्घाटन करतील. मोदी देशात केंद्रीय विद्यालय (केवी) साठी २० नवीन इमारती आणि १३ नवीन नवोदय विद्यालय (एनवी)चे उद्घाटन करतील. पंतप्रधान देशभरात ५ केंद्रीय विद्यालय, एक नवोदय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांसाठी ५ बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन करतील.

मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये IIT भिलाई, IIT तिरुपती, IIT जम्मू, IIITDM कांचीपुरमचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) कानपूर आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कॅम्पस – देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) येथे उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन नवीन IIM चे उद्घाटनदेखील होईल. यात IIM जम्मू, IIM बोधगया आणि IIM विशाखापट्टणमचा समावेश आहे. याशिवाय, देशभरात केंद्रीय विद्यालय (KV) साठी 20 नवीन इमारती आणि 13 नवीन नवोदय विद्यालय (NV) इमारतींचे उद्घाटनदेखील पार पडणार आहे.

SL/KA/SL

19 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *