Paytm च्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ

 Paytm च्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सक्तवसुली संचालनालयाला (ED) कडून क्लिनचिट मिळाल्यावर आता पेटीएमच्या शेअर्सने चांगलीच उसळी घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ED) त्यांच्या तपासणीत आढळून आले की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. पेटीएमचे शेअर्स आज 100 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले आहेत. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 358.55 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. पेटीएम शेअर्सच्या वाढीमागे दोन कारणे असल्याचे मानले जाते. पहिले कारण म्हणजे नोडल खाती ॲक्सिस बँकेत हस्तांतरित करणे. दुसरे कारण ईडीचा अहवाल असल्याचे मानले जात आहे.बर्नस्टीनच्या अहवालानुसार कंपनीच्या शेअर्सची किंमत 600 रुपयांपर्यंत जाऊ शकते. ब्रोकरेज हाऊसने ॲक्सिस बँकेच्या निर्णयानंतर लक्ष्य किंमत वाढवली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर 1 फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरण झाली. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची किंमत 761 रुपयांवरून घसरून 608.80 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरूच राहिले. एकेकाळी पेटीएमच्या शेअर्सची किंमत 318.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती.

पेटीएम ब्रँडचे संचालन करणाऱ्या फिनटेक फर्म One97 कम्युनिकेशन्सने आपले नोडल (मुख्य) खाते नियामक कारवाईमुळे प्रभावित पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत हलवले आहे. पेटीएमचे नोडल खाते हे एका मास्टर खात्यासारखे आहे ज्यामध्ये सर्व ग्राहकांचे, व्यापाऱ्यांचे व्यवहार सेटल केले जातात. कंपनीने शुक्रवारी सायंकाळी शेअर बाजाराला याची माहिती दिली. 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यांमध्ये ठेवी आणि व्यवहार थांबवण्याच्या आरबीआयच्या निर्देशानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

SL/KA/SL

19 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *