सफाई कामगारांच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत वसाहती रिकाम्या करणार नाही

 सफाई कामगारांच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत वसाहती रिकाम्या करणार नाही

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेच्या ३६ वसाहती १५ डिसेम्बर व २१ डिसेम्बर रोजी खाली करून देण्याच्या नोटीसा सफाई कामगारांना देण्यात आल्या आहेत . कामगाराच्या मुलांच्या शाळा , कॉलेजाच्या परीक्षा एप्रिल २०२३ पर्यंत संपणार आहेत , तोपर्यंत कामगारांच्या लहान मुलांच्या वार्षिक परीक्षा एप्रिल २०२३ पर्यंत संपत नाहीत तोपर्यंत म न प प्रशासनाने वसाहती खाली करून घेऊ नयेत अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली . मात्र एखादी इमारत कधीही कोसळू शकते अशी स्तिथी असेल तर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवित सुरक्षित राहण्यासाठी फक्त तीच इमारत खाली करून घेण्यास आमची काहीच हरकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

२९ हजार ६१८ सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar श्रम साफल्य आवास योजनेद्वारे मालकी हक्कांची घरे देण्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला नाही , महापालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर २४ विभागातील २९ हजार ६१८ सफाई कामगार सोमवार १४ डिसेम्बर २०२२ पासून विभागावर निदर्शने करणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली . तसेच सोमवार १९ डिसेम्बर २०२२ पासून प्रत्येक वसाहतीमध्ये थाळीनाद आणि धरणे आंदोलन करणार आहेत आणि बुधवार २१ डिसेम्बर २०२२ पासून सर्वपक्षीय माजी नगरसेवक , विद्यमान आमदार , खासदार यांच्या घरी जाऊन मागण्याचे निवेदन देणार यापैकी कोणीही दाद घेतली नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी मूक मोर्चा घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले .The colonies will not be vacated until the annual examination of the children of the sweepers

साफसफाई खात्याचे काम हे घाणीचे काम आहे , घाणीचे काम करताना कामगार निरनिराळ्या आजारांनी ग्रस्त होत आहेत , त्यात प्रामुख्याने टी बी , कँसर , हृदयविकार आदी जीवघेण्या आजाराने कामगार अकाली मृत्यू पावत आहेत ज्या ज्या वेळी देशावर अथवामहाराष्ट्रावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळी मनपा सफाई कामगार सामाजिक बांधिलकीने मदत करण्यास पुढे सरसावला होता . मार्च २०२० पासून हाच सफाई कामगार विरार , वसई , कर्जत कसारा , कळव्यावरुन येऊन स्वतःची व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूशी लढून मुंबईच्या नागरिकांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्याचे काम केले , परंतु कोणत्याही नैसर्गिक संकटावर मात करणारा सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न अद्यापही सुटत नाही हि वस्तुस्तिथी पाहता सफाई कामगारांवर अन्याय करणारी आहे . असेही जाधव म्हणाले.

ML/KA/PGB
9 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *