ब्रिटिश कंपनीने सोडला शकुंतला रेल्वे वरचा हक्क
यवतमाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश कंपनी क्लीक्सनची मालकी असलेली शकुंतला रेल्वे यवतमाळ ते मुर्तीजापुर आणि मूर्तीजापुर ते अचलपूर धावत होती. परंतु ही रेल्वे काही कारणाने गेले अनेक वर्ष बंद पडली आहे. मात्र या मार्गावर सदर कंपनीचा अधिकार कायम होता .त्यामुळे ब्रॉडगेज निर्मितीसाठी मोठी अडचण होती .
परंतु यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास समितीने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती . सदर याचिकेचा निकाल नुकताच लागला असून, यामध्ये क्लीक्सन या ब्रिटिश कंपनीने आपला हक्क सोडला आहे.
याबाबतचा निर्णय न्यायाधीश जितेंद्र जैन आणि के आर श्रीराम यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे आता ब्रॉडगेज निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे .
याबाबत शकुंतला रेल्वे विकास समितीचे समन्वयक अक्षय पांडे यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे यवतमाळ मुर्तीजापुर ब्रॉडगेज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेले अर्थसंकल्पामध्ये तरतूद सुद्धा जाहीर केली आहे. सदर मार्ग निर्मिती झाल्यास यवतमाळ जिल्ह्यातील दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे.
ML/ML/SL
10 July 2024