ठाण्यात ईमेलद्वारे ज्यू धर्मास्थळी बॉम्बची अफवा.
ठाणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात आज बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना अज्ञात मेलवरद्वारे देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. बॉम्बशोधक नाशक पथक दाखल झाले ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.ठाणे पोलिसांनी शोध कार्य सुरू केले, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनातकरण्यात आला होता. बॉम्ब शोधक नाशक पथकांनी कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाती काहीही सापडले नसून ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. या ईमेल प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे असे यावेळी ठाणें पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर परिसरात पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
ML/KA/PGB 27 Dec 2023