टिम इंडीयाचा फॉर्म ढासळला, इंग्लंडकडून दारूण पराभव
ॲडलेड,ऑस्ट्रेलिया,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टिम इंडीयाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे हास्यास्पद प्रदर्शन झाल्याने चाहत्यांची निराशा झाली.
भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स या सलामीवीरांनीच भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले आहे.
त्यामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना, विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न व या स्पर्धेतील भारताचे आव्हान आज संपुष्टात आले आहे.
विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार लोकेश राहुल आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद आता हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे.