ताम्हिणी घाटात खासगी बस अपघातात पाच प्रवासी ठार

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.तर बस मधील बाकी २७ प्रवाशांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात purple ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्रमांक.MH14GU3405 अपघात होऊन पलटी झाली आहे. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी पलटी झाली आहे. यातील पाच मृत झाले असून गंभीर असलेल्या तीन जणांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इतर जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.
बसमधील ४५ प्रवाशांपैकी २७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
ML/ML/PGB 20 Dec 2024