लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन

 लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या १५ खासदारांपैकी ५ खासदार हे कॉंग्रेसचे आहेत.

काल दोन तरुणांनी संसदेत हुल्लडबाजी केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळही केल्याचे पाहायला मिळाले होते.

काल झालेल्या या घटनेवर गंभीर दखल घेत विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन केले आहे. सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांची नावं दिल्यानतंर 15 विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आणला होता. तो सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या भर्तृहरी महाताब यांनी मंजूर केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबीत झालेले १५ खासदार

टीएन प्रथापन, हीबी एडेन, जोथिमनी, राम्या हरिदास , डीन कुरियाकोस, बेनी बेहानान, वीके श्रीधरन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोई करुणानिधि, के सुब्रमण्यन, एसआर पारथीबान, एस वेंकटेशन , मणिकम टैगो ( लोकसभेतील खासदार) डेरेक ऑब्रायान (राज्यसभेतील खासदार)

SL/KA/SL

14 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *