खलिस्तानचा समर्थक अमृतपाल सिंगला अटक

 खलिस्तानचा समर्थक अमृतपाल सिंगला अटक

चंदीगड, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल ३६ दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक तसेच ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला आज सकाळी पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता.

अमृतपालला आपल्या समर्थकांच्या जमावाने येथे पोलीसांकडे समर्पण करायचे होते. अमृतपालला भटिंडा विमानतळावरून विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपाल गेल्या आपल्या एका समर्थकाच्या सुटकेसाठी अमृतपालने 23 फेब्रुवारीला पंजाबमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. त्यानंतर ३६ दिवसांपासून तो फरार होता.या घटनेनंतर पोलिस त्याचा शोध घेत होते.

अमृतपालला समर्थकांच्या गर्दीसह सरेंडर यायचे होते. त्यासाठी तो शनिवारी रात्री मोगाच्या रोडे गावात पोहोचला. येथे त्याच्या जवळच्या मित्रांनी पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यासाठी रविवार म्हणजेच आजचा दिवस निवडला होता. सरेंडर करण्याच्या वेळी अमृतपालला आपली ताकद दाखवायची होती.

जमाव जमल्याने काहीतरी वातावरण बिघडण्याची भीती पंजाब पोलिसांना वाटत होती. त्यामुळे अमृतसरचे एसएसपी सतिंदर सिंह आणि पंजाब पोलिस इंटेलिजन्सचे आयजी रविवारी सकाळीच रोडे गावातील गुरुद्वारात पोहोचले. पोलिस साध्या गणवेशात आले आणि सकाळीच अमृतपालला अटक केली.

अमृतपाल सिंगला ज्या गावातून पकडण्यात आले. ते गाव पंजाबचे रोडे गावात जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांचे जन्मगाव आहे. एवढेच नाही तर वारिस पंजाब दे चा प्रमुख होण्यासाठी अमृतपाल सिंग याने येथे दस्तरबंदी सोहळा केला होता.

SL/KA/SL

23 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *