फेब्रुवारी 2025 साली अंतराळातून परतणार सुनिता विल्यम्स
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स दुसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळात अकडले आहेत. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात फसलेल्या दोघांना अंतराळवीरांना घरवापसीसाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. यातील एका पर्यायाचा विचार केल्यास दोघा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी 2025पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यात स्पेसएक्सदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासाचा मुख्य पर्याय हा बुच आणि सुनीता यांना स्टारलायनर यानातून पृथ्वीवर परत आणण्याचा आहे. तसंच, त्याचबरोबर अन्य काही पर्याय आहेत का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. पण त्यांना येण्यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीला विल्यम्स दुसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळात अकडले आहेत. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात फसलेल्या दोघांना अंतराळवीरांना घरवापसीसाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. यातील एका पर्यायाचा विचार केल्यास दोघा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी 2025पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यात स्पेसएक्सदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासाचा मुख्य पर्याय हा बुच आणि सुनीता यांना स्टारलायनर यानातून पृथ्वीवर परत आणण्याचा आहे. तसंच, त्याचबरोबर अन्य काही पर्याय आहेत का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. पण त्यांना येण्यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.