विद्यार्थ्यांनी साकारली २२x२२ फूट आकाराची इको फ्रेंडली राखी

 विद्यार्थ्यांनी साकारली २२x२२ फूट आकाराची इको फ्रेंडली राखी

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण जगात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नागपुरातील ललिता पब्लिक शाळेतील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २२x२२ फूट एवढ्या आकाराची इको फ्रेंडली राखी साकारली आहे. यात एक पेड मा के नाम, पर्यावरणाला वाचवा असे सामाजिक संदेश देणारी ही भव्य दिव्य राखी साकारण्यात आलेली आहे.

यासोबत जागतिक छायाचित्र दिवस सुद्धा याच दिवशी साजरा होणार असून असे चित्र या भव्य राखीत साकारले आहे. या भव्य राखीला साकारण्यासाठी शाळेच्या संचालिका चेतना टांक, सोबत मंजिरी जोशी मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे.

PGB/ML/PGB
18 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *