अंबाजोगाईच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती

 अंबाजोगाईच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती

बीड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील अर्धा एकरात सेंद्रिय भाजपाल्याची शेती फुलवली असून गांडूळ खताची निर्मिती देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.students of Ambajogai Agricultural College

केंद्र आणि राज्य सरकारच्या सेंद्रिय कृषी धोरणानुसार अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्धा एकरात लागवडीच्या तंत्रज्ञानापासून व्यवस्थापन करून सेंद्रिय शेती फुलवली असून गांडूळ खताची निर्मिती देखील केली आहे. तर हाच भाजीपाला विद्यार्थी महाविद्यालयात स्टॉल लावून विक्री करत आहेत. Students are selling these vegetables in college stalls.

अनुभवातून शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कृषी पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी सेंद्रीय पध्दतीने भाजीपाल्याचे उत्पादन केले आहे. यात काकडी, वांगे, पत्ता कोबी, मिर्ची, मेथी, कोथिंबीर, पालक,मुळा, शेपू, गाजर, लसूण, यासह १५ भाजीपाल्याचा समावेश आहे. रासायनिक खतांचा वापर न करता शेण खत, गांडूळ खताचा वापर केला आहे. अगदी या पिकावर निंबोळी अर्क फवारण्यात आला असून शेतीच्या मशागती पासून लागवड देखील कृषी महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

22 वर्षानंतर या कमी सुपीक असलेल्या जमिनीवर विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचा भाजीपाला पिकवला आहे यात चार टन काकडी उत्पादन घ्यायचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे असून आजपर्यंत एक टन काकडी हार्वेस्टिंगच्या माध्यमातून विकली आहे. तर सरकारच्या “विकेल ते पिकेल’ योजनेनुसार भाजीपाला विकण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार आहेत. प्रॅक्टिकल ज्ञानातून ज्ञानार्जन म्हणजेच जमिनीच्या मशागतीपासून पूर्ण भाजीपाला विक्री करण्यापर्यंत या महाविद्यालयात माहिती दिली जात असल्याचे विद्यार्थीनी सांगतात

कृषी महाविद्यालय अंबाजोगाई येथील आठरा सत्रातील विद्यार्थ्यांसाठी अनुभवातून शिक्षण कार्यक्रमांतर्गत आठव्या सत्रांमध्ये काही मोडूल या ठिकाणी घेतले जातात आणि त्यामध्ये दोन मोड्यूल मिळून एक हजार मार्कासाठी आपण याठिकाणी कमर्शियल हॉर्टिकल्चर प्रोडक्शन कमर्शिअल व्हेजिटेबल प्रोडक्शन आणि त्या बरोबरच स्वयल्स सायन्स या विषयांमध्ये गांडूळ खत निर्मिती घेतलेले आहेत.या पूर्ण मोडूल मध्ये शंभर टक्के मुलांचा सहभाग असतो.यातून मुलांना भविष्यासाठी याचा फायदा होतो students of Ambajogai Agricultural College

आरोग्याच्या दृष्टीने शहरी भागातील नागरीक सेंद्रिय भाजीपाला खरेदीकडे वळत आहेत. तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात फुलवलेली सेंद्रिय शेती यातून आम्हाला नागरिकांना संदेश द्यायचा आहे की सेंद्रिय शेती ही उपलब्ध जागेवर, म्हणजे घराच्या छतावर देखील होऊ शकते हाआत्मविश्वास आम्हाला या सेंद्रिय शेतीतून जनतेला द्यायचा आहे. We want to give confidence to the people through this organic farming.

सेंद्रीय शेतीमध्ये लागवडीच्या तंत्रज्ञानापासून पूर्ण व्यवस्थापन हे कृषिचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी करत असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या सेंद्रिय शेतीच्या कृषी धोरणानुसार या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मदतीने राबवण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीचा फायदा  रासायनिक खत न वापरता आणि स्थानिक निविष्ठा वापरून उत्पादन खर्च जर कमी झाला तर एकूण उत्पन्नामध्ये नफ्याचे प्रमाण वाढेल यामुळे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण साध्य होईल.

ML/KA/PGB

28 Feb 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *