भांडवली बाजारात नफावसुली सेन्सेक्स व निफ्टीची पाच महिन्यातील सगळ्यात खराब कामगिरी 

 भांडवली बाजारात नफावसुली सेन्सेक्स व निफ्टीची पाच महिन्यातील सगळ्यात खराब कामगिरी 

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवडयात बाजारात चांगलीच नफावसुली झाली. जागतिक बाजारातील घडामोडीचा असर बाजारावर झाला चीन मधील विजेच्या टंचाईचे संकट व त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होण्याची काळजी,,वीजेची वाढती मागणी कोळसा व गॅसचे वाढते भाव तेथील Evergrande या रिअल इस्टेट कंपनीवरील संकट,.यू.एस डेट सिलिंग क्रायसेस आणि यू.एस बॉण्ड यील्ड मधील वाढ(US debt ceiling crisis and uptick in bond yield,क्रूड ऑइलच्या भावाचा तीन वर्षाचा उचांक(Oil Prices Surge To Three-Year Highs), मंथली एक्सपायरी,सप्टेंबरमधील युरोझोन मधील ३.४% असे वाढलेले महागाईचे आकडे(High Eurozone inflation at 3.4 percent in September), ऑटो सेक्टरचे विक्रीचे आकडे या सगळ्याचा परीणाम बाजारावर झाला
 
 
बाजार सपाट बंद झाला.सेन्सेक्सने ६०,००० च्या वरती बंद होण्यात यश मिळवले Markets end on flat note with Sensex holding above 60,000 level.
 
सोमवारी बाजाराची सुरुवात चांगली झाली. दिवसभरात सेन्सेक्सने ६०,४१२ चा व निफ्टीने १७,९४७ चा नवीन उच्चतम स्तर गाठला.दिवसभरात बाजारात प्रचंड चढ उतार होता. मार्केट आपली तेजी टिकवण्यात अपयशी ठरला. वरच्या स्तरावर नफावसुली झाली. IT, pharma आणि FMCG क्षेत्रात नफावसुली झाली. रिअल इस्टेट व ऑटो क्षेत्राने आपली तेजी टिकवली.बाजाराचे लक्ष August’s core sector output data आणि September’s manufacturing PMI ह्याकडे लागले होते. बाजार सपाट बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स २९ अंकांनी वधारून ६०,०७७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २ अंकांनी वधारून १७,८५५ चा बंद दिला.
 
 
 
 
 
सेन्सेक्स १,००० अंकांनी घसरला बंद होताना आपली घसरण कमी करण्याचा प्रयत्न. Sensex recovers after 1000-point fall
 
मंगळवार बाजारासाठी अमंगल ठरला. बाजाराची सुरुवात सपाट झाली. परंतु दिवसभरात सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला. U.S. bond yields मध्ये झालेली वाढ ,चीन मधील Evergrande या रिअल इस्टेट कंपनीवरील संकट,चीन मधील वीजेचे संकट (China Power Crunch) वीजेची वाढती मागणी कोळसा व गॅसचे वाढते भाव,सप्टेंबर मधील मंथली एक्सपायरी,क्रूड ऑइलच्या भावाचा तीन वर्षाचा उचांक(Oil Prices Surge To Three-Year Highs).आय.टी.(I. T) क्षेत्रातील नफावसुली ( I. T क्षेत्राने ह्या वर्षभरात जवळपास ८२ % रिटर्न दिले.) ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाल्याने बाजाराची घसरण झाली. बाजाराने बंद होताना आपली घसरण कमी करण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
Sensex & Nifty close in the red but off lows
 
जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका भारतीय बाजाराला बुधवारी बसला. मार्केट उघडताच सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला. मंगळवारी झालेली डाऊ जोन्स(Dow Jones) मधील ४७० अंकांची घसरण ,U.S. bond yields मध्ये झालेली वाढ, ब्रेंट क्रूड ऑइलचे(Crude Oil) वाढलेले भाव याचा परिणाम भारतीय बाजारावर साफ दिसला दिवसभरात मार्केटने घसरण कमी करण्याचा प्रयत्न केला. power, metal, realty आणि pharma क्षेत्रातील समभागात खरेदी दिसली.बाजार बंद होताना सेन्सेक्स २५४ अंकांनी घसरून ५९,४१३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३७ अंकांनी घसरून १७,७११ चा बंद दिला.
 
 
 
सलग तिसऱ्या दिवंशी व मंथली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात घसरण. Markets fall for the third consecutive session in the rangebound trading amid F&O expiry.
 
गुरुवारी सप्टेंबर एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात सपाट झाली परंतु नंतर जागतिक बाजारातील कमजोरीमुळे बाजार घसरला वरच्या स्तरावर गुंतवणूकदारानी नफावसुली केली. यू.एस डेट सिलिंग क्रायसेस आणि यू.एस बॉण्ड यील्ड मधील वाढ(US debt ceiling crisis and uptick in bond yield) यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच ऑगस्ट मधील कोर सेक्टर आकडे (August’s core sector output data)जाहीर होण्याअगोदर बाजाराने सावध भूमिका घेतली. Nifty Pharma आणि PSU Bank वगळता सगळ्या क्षेत्रात घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २८६अंकांनी घसरून ५९,१२६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ९३ अंकांनी घसरून १७,६१८ चा बंद दिला.
 
 
 
सेन्सेक्स व निफ्टीचे पाच महिन्यातील सगळ्यात खराब प्रदर्शन. Sensex, Nifty Log Worst Week In Over Five Months.
 
जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजाराला बसला. सलग चवथ्या दिवशी बाजार घसरला बाजारात मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली. core sector चे आकडे चांगले असताना देखील बाजार खाली आला. दिग्गज शेअर्स मधील विक्री,सप्टेंबरमधील युरोझोन मधील ३.४% असे वाढलेले महागाईचे आकडे(High Eurozone inflation at 3.4 percent in September) व चीन मधील संकट(Chinese crisis) असा दुहेरी फटका बाजाराला बसला.ग्लोबल ग्रोथ मंदावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ऑटो सेक्टरचे आकडे देखील उत्साहवर्धक नसलाच्या परिणाम देखील बाजारावर झाला. सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे MARUTI ने सलग तिसऱ्या महिन्यात उत्पादन कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. दिवसभरात मेटल आणि फार्मा समभागात थोडी खरेदी झाली.बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरून ५८,७६५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८६ अंकांनी घसरून १७,५३२ चा बंद दिला.
 
 
 
जितेश सावंत
 
शेअर बाजार तज्ञ,
 
Technical and Fundamental Analyst-Stock Market
 
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/PGB
2 Oct 2021
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

mmc

Related post