या फरार उद्योगपतीवर सेबीकडून १० वर्षांसाठी शेअर मार्केट बंदी

 या फरार उद्योगपतीवर सेबीकडून १० वर्षांसाठी शेअर मार्केट बंदी

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीबाबत  फरार उद्योगपती मेहुल चोक्सीवर कडक कारवाई केली आहे.काल जारी केलेल्या आदेशात सेबीने मेहुल चोक्सी यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये १० वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे. यासोबतच ५ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चोक्सींना ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा करावी लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.(Sebi debars Mehul Choksi from markets for 10 years )

चोक्सी हे गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते आणि ते समूहाच्या प्रवर्तकांपैकी एक होते. हे प्रकरण एक दशक जुने आहे. सेबीने जुलै २०११ ते जानेवारी २०२२ दरम्यान गीतांजली जेम्सच्या शेअर बाजारातील व्यवहाराबाबत तपास केला होता. चोक्सीने चुकीच्या पद्धतीने गीतांजली जेम्सचे शेअर बाजारात सादर केल्याचे सेबीने म्हटले आहे. त्यांनी या कंपनीचे शेअर्स फ्रंट एंटिटीजच्या माध्यमातून कॉर्नर केले आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी बाजारात कमी शेअर्स सोडले. यामुळे फसव्या पद्धतीने शेअर्सच्या किमतीत वाढ झाली.

यानंतर, चोक्सी  यांना सेबीकडून मे २०२२ मध्ये कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये तो चुकीच्या व्यवहारात दोषी आढळला होता.

SL/KA/SL

1 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *