आरबीआयच्या रेपो दरात बदल न करण्याच्या आश्‍चर्यकारक निर्णयाने बाजारात (Stock Market) तेजी

जितेश सावंत गेल्या आठवड्यात 5 पैकी 2 दिवस बाजार बंद असल्याने फक्त 3 दिवस व्यवहार झाले अत्यंत छोट्या आठवड्यात व सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीचा सिलसिला सुरु राहिला.FII खरेदी, FY23 साठीचे हायर टॅक्स कलेक्शन, दुसरे सर्वोच्च मंथली GST कलेक्शन आणि मजबूत उत्पादन PMI डेटा आणि रिझर्व्ह बँकेने दरवाढ थांबवण्याचा घेतलेला आश्‍चर्यकारक निर्णय या बळावर बाजारात तेजी पसरली व गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. RBI surprises with a pause, keeps repo rate unchanged at 6.5%आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर न वाढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी आली,पण अमेरिकन बँकांच्या दिवाळखोरीच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. जागतिक महागाई हे देखील एक मोठे संकट आहे.शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआय जागतिक वित्तीय बाजारावर लक्ष ठेवून आहे.सध्याचा काळ अनिश्चिततेने भरलेला असला तरीही भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत स्थितीत आहे.आणि महागाईविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे.तसेच रुपयाची स्थिरता कायम ठेवण्याचे काम देखील सुरू आहे. दर न वाढवण्याचा निर्णय हा या पॉलिसी पुरता मर्यादित आहे. Economists welcome RBI’s move to keep repo rate unchanged but warn of another rate hikeयेणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींकडे राहील. शुक्रवारी १४ एप्रिल रोजी बाजार आंबेडकर जयंती निमित्त बंद राहतील.Technical view on nifty- शुक्रवारी निफ्टीने 17599 चा बंद दिला.मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये आहे.वरच्या स्तरावर थोडी नफावसुली दिसेल. या आठवड्यात निफ्टी 17665-17731-17750-17800 हे वरचे स्तर गाठू शकेल. तसेच निफ्टीसाठी 17500 -17428-17381-17200 हे स्तर अत्यंत महत्वपूर्ण राह्तील हे स्तर तुटल्यास निफ्टीत घसरण वाढेल व निफ्टी 17126-16940 ह्या पातळ्या गाठेल. बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. नवीन आर्थिक व्यवहाराच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी आणि संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदार सावध पवित्र घेताना दिसले परंतु बाजार वाढीसह बंद झाले. ओपेक आणि सहयोगी देशांच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती त्यामुळे जागतिक संकेत मुख्यत्वे नकारात्मक होते.बाजारात मोठया प्रमाणात अस्थिरता दिसली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 114.92 अंकांनी वधारून 59,106.44. वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 38.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,398.05 चा बंद दिला. Sensex and Nifty settled with gains for the third straight session on Monday despite a spike in crude oil prices.शेअर बाजारात धमाल. सेन्सेक्स 582 अंकांनी वधारला.सलग चवथ्या सत्रात भारतीय शेअर बाजाराची घोडदौड सुरूच राहिली.अत्यंत शांत अश्या सुरुवातीनंतर बुल्सने पूर्णपणे बाजारावर नियंत्रण मिळवले.इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 60,000च्या जवळ पोहोचला तर निफ्टीने 17,550 चा टप्पा पार केला. विंडफॉल कर कपातीमुळे आणि रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर धोरणाअगोदर बाजारात सकारात्मकता दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 582.87 अंकांनी वधारून 59,689.31 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 159 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,557 चा बंद दिला. Indices ended Wednesday’s session broadly in the greenरेपो दरात वाढ न झाल्याने बाजारात तेजी. सलग पाचव्या दिवशी भारतीय बाजाराने तेजीचा सिलसिला कायम ठेवला. बाजाराची सुरुवात कमकुवत झाली होती. पण आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर न वाढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी पसरली.MPC ने एकमताने दर वाढीला विराम दिला आणि मे 2022 पासून सलग सहा दरवाढीनंतर रेपो दर 6.5 टक्के वर बदल न करता तसाच ठेवला.तर जीडीपी वाढीचा अंदाज 10 अंकांनी वाढवला .निफ्टीच्या 50 पैकी 30 समभाग वाढले. त्याच वेळी, सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभागांमध्ये वाढ झाली. रिअल इस्टेट, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 143.66 अंकांनी वधारून 59,832.97 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 42.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,599.20 चा बंद दिला. Sensex, and Nifty rise for 5th day in a row(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *