आठ दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची प्रतिष्ठापना.
सांगली, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात अवघ्या आठ दिवसात दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवण्यात आला आहे.statue of Chhatrapati Shivaji Maharaj
आष्टा शहरातल्या शिवप्रेमींनी दुसऱ्यांदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहरामध्ये प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्यांदा 25 डिसेबरला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये सिंहासन आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मात्र परवानगी नसल्यामुळे हा पुतळा काढण्यात आला होता.
आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. या घडलेल्या घटनेने प्रशासन पुन्हा चक्रावून गेले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ML/KA/PGB
03 Jan. 2023