राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन
बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन आज बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलं होतं . आदीवासी भिल्ल समाजाचे ग्रामदैवत असलेल्या बुलडाणा शहरातील जगदंबा माता यांच्या मंदिरातून बिरसा मुंडा आणि तंट्या भिल यांच्या प्रतिमेला पूजन सह संविधान, आदिवासी ग्राम साहित्याचे पूजन करून या ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली.
शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या दिंडीचा समारोप साहित्यस्थळी झाला. या ग्रंथ दिंडीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर 12 वा राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ यांच्या हस्ते झाले.State Level Tribal Bhil Literature Conference
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ नानासाहेब गायकवाड हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजयराज शिंदे, आदिवासी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष दिलीप मोरे , संघटनेचे राज्याध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिकून सवरून मोठ्या झालेल्या समाज बांधवांनी समाजातील अन्य घटकांच्या उद्धारासाठी आपले योगदान द्यावं असं आवाहन या साहित्य संमेलनाचे उद्घाटक हेमंत काळमेघ यांनी व्यक्त केलं.
यावेळी समाजाच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकलव्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक कवी आणि आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….
ML/KA/PGB
2 Apr. 2023