कोकणात शेती कामाला सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्व जिल्ह्यात आता शेती कामांना सुरुवात झाली आहे .कोकणात गेल्या दोन दिवसापासून मान्सून शेतीला पूरक असल्याप्रमाणे पडत आहे. यामुळे कोकणातील जिल्ह्यात शेती कामांना सुरुवात झाली आहे. नांगरणी आणि पेरणी शेतकरी करत आहेत. पारंपारिक बैल जोड्यांच्या जोता बरोबरच आधुनिक पॉवर टिलरचा देखील वापर आता सध्या जिल्ह्यात होतो आहे. जसजसा पाऊस पडत जाईल तसा शेती कामाला वेग येईल.

ML/ML/SL

9 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *