एस टी बँक – गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची चौकशी…

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता असणाऱ्या स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेतून सभासदांनी तब्बल 180 कोटी रुपये काढल्याचे सरकारकडून सोमवारी मान्य करण्यात आले असून या प्रकरणी दोन महिन्यात चौकशी सहकार आणि पणन कायदा 89 नुसार करण्यात येईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत जाहीर केले .
सहकार आयुक्ताना दोन महिन्यात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. अनिल परब आणि सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सहकार मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचा सभासद हा पगारदार असल्याने जामीनदाराची गरज नाही असे ठरविले होते. कर्जाचे व्याजदर 9 टक्के तसेच 14 टक्के वरुन 7 टक्के कमी करण्याचा ठराव रिझर्व्ह बँकेने मागे घेतल्याचे देखील सरकारकडून लेखी उत्तरात म्हटले आहे .
दरम्यान बॅंकेवरीस संचालक मंडळ बरखास्त करणार का? बॅंकेवर प्रशासक नेमणार का?असा प्रश्न
अनिल परब यांनी सरकारला विचारला..
यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की ठेवी काढल्या हे सत्य आहे…बॅंकेवर प्रशासक लावावा असा कोणताही अर्ज किंवा मागणी आमच्याकडे नाही..बॅंकिंग रेग्युलेशन एक्ट मध्ये नुकतेच काही बदल झालेत आता बॅंकांचे संचालक मंडळ बरखास्त करायचे असेल तर तो अधिकार आता रिझर्व बॅंकेने आपल्याकडे ठेवलाय.. बॅंकेने व्याजाचे दर वाढवला आहे..9 टक्के आणि 14 टक्के व्याजदर होता तो संचालक मंडळाने कमी करण्याचा म्हणजे 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल 180 कोटी रुपये सभासदांनी काढून घेतले हे ही खरं आहे असे स्पष्ट केले.
ML/KA/SL
11 Dec. 2023