रामायणातील सप्तकांडांवर आधारित विशेष कीर्तन महोत्सव

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्यान चैत्रोत्सवानिमित्त अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामायणातील सप्तकांडांवर वर आधारित कीर्तन २२ मार्च ते २९ मार्च २०२३ दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होतील. Special kirtan festival based on Saptakanda of Ramayana
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड यासह श्रीसमर्थांचा भक्तवत्सल श्रीराम अशी आठ कीर्तने होतील. ह.भ.प.भालचंद्रबुवा पटवर्धन, माधवी पवार -घाग, सुहासबुवा सरपोतदार, उमा तेंडोलकर, चंद्रशेखर अभ्यंकर, विजया वैशंपायन, मंजुषा भाभे आणि मेधा गोगटे- जोगळेकर या कीर्तनकारांची ही कीर्तने होतील.
श्रीरामनवमीच्या दिवशी ३० मार्च रोजी सकाळी अकरा वाजता श्रीरामजन्मोत्सव कीर्तन ह.भ. प. अरूण उमावणे करतील. हा कीर्तन महोत्सव द.ल.वैद्य मार्ग,दादर (पश्चिम) येथील संस्थेच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात होणार आहे. हा कीर्तन महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. नागरिकांनी सप्तकांडांवर आधारित वैशिष्टयपूर्ण कीर्तनांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय कीर्तन संस्थेने केले आहे.
अखिल भारतीय कीर्तन संस्था १९४० पासून कार्यरत असून संस्थेतर्फे विविध उपक्रम, कार्यक्रम केले जातात. संस्थेतर्फे तीन वर्षाचा कीर्तनालंकार पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कीर्तन परंपरा सशक्त करून पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
ML/KA/PGB
19 Mar. 2023