विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदभार स्वीकाराला

 विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदभार स्वीकाराला

मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे व 1994 च्या तुकडीतील आय पी एस अधिकारी देवेन भारती यांनी आज पोलीस मुख्यालयात विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.Special Commissioner of Police Deven Bharti assumed chargeमुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आले असून, या पदावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. देवेन भारती हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम करणार असले तरी कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, अभियान आणि वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचही सहआयुक्तांच्या कामावर नियंत्रण आणि देखरेख करण्याची जबाबदारी विशेष आयुक्तांकडे देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना हा धक्का मानला जात आहे. एकाच म्यांनमध्ये दोन तलवारी ठेवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांनी या नियुक्तीने आश्चर्य व्यक्त केले आहे.
देवेन भारती हे 1994 च्या तुकडीतील पोलीस अधिकारी आहेत. यापूर्वी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपद अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. ठाकरे सरकारमध्ये ३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती.

ML/KA/PGB
05 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *