विशिष्ट पोलाद क्षेत्रासाठी 6,322 कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेला मंजुरी

 विशिष्ट पोलाद क्षेत्रासाठी 6,322 कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेला मंजुरी

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील विशिष्ट पोलाद (speciality steel) क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने गुरुवारी 6,322 कोटी रुपयांच्या प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन योजनेला (PLI Scheme) मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ठाकूर यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षांत या योजनेंतर्गत 6,322 कोटी रुपये किंमतीचे प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे 5.25 लाख रोजगार निर्माण होतील. यामुळे उत्पादन वाढण्यास आणि आयात कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

40,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक येईल
An additional investment of Rs 40,000 crore

पोलाद मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या योजनेतून सुमारे 40,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक येईल. तसेच, विशिष्ट पोलाद (speciality steel) क्षमता 2.5 कोटी टनांनी वाढण्याची अपेक्षा आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षे (2023-24 ते 2027-28) असेल. पीएलआय योजनेंतर्गत (PLI Scheme) कोटेड/ प्लेटेड पोलाद उत्पादने, उच्च क्षमतेचे पोलाद, विशेष प्रकारचे रेल, मिश्र पोलाद उत्पादने आणि पोलाद वॉयर आणि इलेक्ट्रिकल पोलाद येतील.

पात्र उत्पादकांना वाढीव उत्पादनावर 4 ते 12 टक्के दरम्यान प्रोत्साहन
Incentives to eligible producers on increased production between 4 and 12 per cent

या पोलाद उत्पादनांचा वापर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारखी इलेक्ट्रिक उत्पादने, वाहने आणि त्यांचे सुटे भाग, तेल आणि वायु वाहतुकीसाठी पाईप, बॉयलर, संरक्षण क्षेत्रात उपयोगात येणार्‍या बॅलिस्टिक आणि आर्मर शीट, हाय-स्पीड रेल्वे रुळ, टर्बाइन उपकरण, वीजेचे ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिकल पोलादामध्ये केला जातो.
मंत्रालयाच्या मते, मूल्यवर्धित पोलाद उत्पादने मोठ्या प्रमाणात भारतात आयात केली जातात. या योजनेंतर्गत पात्र उत्पादकांना वाढीव उत्पादनावर 4 ते 12 टक्के दरम्यान प्रोत्साहन दिले जाईल. निवेदनानुसार, भारतात चिन्हांकित विशिष्ट पोलाद (speciality steel) ग्रेडच्या निर्मितीमध्ये गुंतलेली कोणतीही नोंदणीकृत कंपनी या योजनेत भाग घेण्यास पात्र असेल.
मंत्रालयाने म्हटले आहे की विशिष्ट पोलादासाठी पीएलआय योजनेंतर्गत (PLI Scheme) कंपन्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की विशिष्ट पोलाद (speciality steel) बनवण्यासाठी वापरण्यात येणारी मूलभूत पोलाद देशामध्ये ‘वितळवून व मोल्ड’ केले जावे. याचा अर्थ असा आहे की विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल भारतातच बनविला जाईल. अशाप्रकारे संपूर्ण उत्पादन देशातच सुनिश्चित होईल.
The government on Thursday approved a Rs 6,322-crore Production Linked Incentive (PLI Scheme) to boost production in the country’s specialty steel sector. A decision to this effect was taken at a meeting of the Union Cabinet chaired by Prime Minister Narendra Modi. Information and Broadcasting Minister Anurag Thakur gave this information. Thakur said the scheme would provide an incentive of Rs 6,322 crore over the next five years.
PL/KA/PL/23 JULY 2021
 

mmc

Related post