छोट्या बचत योजनांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

 छोट्या बचत योजनांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वित्त मंत्रालयाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी (Small Savings Schemes) व्याजदर जाहीर केले आहेत. या अंतर्गत या योजनांवर पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहील.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांना सुकन्या समृद्धी योजनेवर गुंतवणूकदारांना 7.60 टक्के व्याज मिळत राहील. तर राष्ट्रीय योजना बचत (NSC) वर 6.8 टक्के व्याज मिळेल. सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) वर 7.1%व्याज मिळेल. किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यावर 6.9 टक्के व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना 7.4 टक्के व्याज मिळेल.

छोट्या बचत योजनांवरील व्याज दोन तिमाहीसाठी बदलणार नाही
Interest on small savings plans will not change for two quarters

या निर्णयाचा अर्थ असा आहे की या छोट्या बचत योजनांवर (Small Savings Schemes) गेल्या दोन तिमाहींपासून मिळत असलेला व्याज दर पुढील तीन महिन्यांपर्यंत मिळेल. परिपत्रकानुसार, बचत खात्यावर 4 टक्के व्याज उपलब्ध असेल, तर मूदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळेल.

पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँकेची बैठक
RBI meeting next week

रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात आपली द्वैमासिक (दोन महिन्यातून एकदा) आर्थिक धोरण बैठक घेत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्याचे दर आहे तेच ठेवू शकते. त्यामुळे या निश्चित योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक व्याज दर मिळत राहतील.

सरकारच्या योजनांमध्ये बँकांच्या योजनांपेक्षाही जास्त व्याज
Government schemes have higher interest rates than bank schemes

रिझर्व्ह बँकेने आहे तेच दर कायम ठेवले तर त्याचा परिणाम असा होईल की त्यानंतर बँकाही त्यांच्या मुदत ठेव (एफडी) आणि इतर योजनांचे व्याजदर कमी करणार नाहीत. सध्या सरकारच्या या योजनांमध्ये बँकांच्या योजनांपेक्षाही जास्त व्याज मिळत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका वर्षाच्या मूदत ठेवीमध्ये मध्ये 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 52,495 रुपये मिळतील. जर तुम्ही तेच पैसे टपाल कार्यालयाच्या मूदत ठेवीमध्ये ठेवले तर तुम्हाला 312 रुपये जास्त मिळतील.

मार्चमध्ये सरकारचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय
The government’s decision to cut interest rates in March

स्टेट बँकेच्या मूदत ठेवींवरचे व्याज 4.90 टक्के आहे तर टपाल कार्यालयाचे व्याज 5.5 टक्के आहे. बचत खात्याबद्दल बोलायचे झाल्यास, स्टेट बँक 2.70 टक्के व्याज देते तर टपाल कार्यालयात वार्षिक 4 टक्के व्याज मिळते. खासगी बँका बचत खात्यांवर 3 ते 3.5 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. मार्चमध्ये सरकारने जून तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील (Small Savings Schemes) व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
The finance ministry has announced interest rates for small savings schemes for the October-December quarter. Under this, the interest on these schemes will continue as before. The decision means that the interest rates on these small savings plans from the last two quarters will continue for the next three months.
PL/KA/PL/01 OCT 2021

mmc

Related post