विद्यार्थ्यांसाठी कौशल अभ्यासक्रमाची केंद्रे सुरु करणार

 विद्यार्थ्यांसाठी कौशल अभ्यासक्रमाची केंद्रे सुरु करणार

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. सदर अर्थसंकल्प ३३४७ . १३ कोटीचे असून यामध्ये महसुली खर्च ३०२७ . १३ कोटी आहे,तर भांडवली खर्च फक्त ३२० कोटी दाखविण्यात आला आहे.
या बजेटमध्ये विध्यार्थ्यांच्या कौशल विकासावर भर देऊन त्याद्वारे त्यांना स्वावलंबी बनविणे हा मुख्य उद्देश आहे. राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करारहि करण्यात आला आहे.

कुठली कौशल्य केंद्रे सुरु करणार

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये जून २०२३ पासून इलेक्ट्रॉनिक, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, फ्रुड सर्व्हिस, हेल्थ अँड हैगिइन,आटोमोबाईल, टुरिझम अँड हॉस्पिटलिटी या अभ्यासक्रमाची कौशल्य केंद्रे सुरु केली जाणार आहेत.
शिक्षण विभागातील बदल्यांमधील भष्टाचार कायमस्वरूपी बंद करून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करुन मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर द्वारे पारदर्शकपणे बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती केली जाणार आहे.

सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

शाळेत समाजकंटकापासून सुरक्षितता उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच त्यांच्यातील निरीक्षण, एकाग्रता व आकलन क्षमता, चौकसपणा व वैज्ञानिक दृष्टीकोनास वाव मिळण्याकरीता प्राथमिक विभागाच्या ८८ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन २०२३-२४ करीता सदर उपक्रम प्रस्तावित आहे.

 

नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे

नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रामध्ये प्रामुख्याने न्यूटनची तबकडी, उपकेंद्री बल, विद्युत घट, भौमितिक क्षेत्रफळ मोजणी, त्रिकोण व चौकोनाच्या मापांच्या बेरजा, मध्यबिंदू प्रयोग इ. छोट्या स्वरूपातील खेळ उपलब्ध करुन देण्यात येतील, जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना आकृत्या, चालना मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या आवश्यक त्या सोयी- सुविधांच्या खर्चात प्रतिवर्षी होणारी वाढ आणि शिक्षण खात्यास प्राप्त होणारे अत्यल्प उत्पन्न याचे आर्थिक गणित जुळविण्याकरीता शिक्षण खात्यास अर्थसंकल्प ‘अ’ कडून निधी वर्ग करण्यात येतो. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण खात्याकडून अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक – ३० च्या उत्पन्न वाढीकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालेय इमारतीवर जाहिराती, बॅनर, होर्डींग्स उभारणे, वर्गखोल्या अभ्यासिका/वाचनालय, खाजगी क्लासेसना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देणे. तसेच शाळेलगतची मैदाने बाह्यसंस्थांना क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांकरीता भाडेतत्वावर देणे अशा प्रकारे येत्या आर्थिक वर्षात नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा शिक्षण खात्याचा मानस आहे.

२०२३-२४ मध्ये प्राथमिक शाळांच्या खर्चापोटी अनुज्ञेय ५० टक्के अनुदान ₹४७७.७७ कोटी अपेक्षित असल्याने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नाखाली ४७७.७७ कोटी इतकी तरतूद ‘प्राथमिक शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान’ या लेखा शीर्षाखाली प्रस्ताविली आहे.प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी दि. ३१.०३.२०२२ पर्यंत राज्य शासनाकडून मुंबई महानगरपालिकेस ₹ ४,४१६.०० कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे. माध्यमिक शिक्षण: माध्यमिक शिक्षणासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार अनुदानित महानगरपालिका माध्यमिक शाळांमधील कार्यरत कर्मचारी वर्गाच्या वेतनावरील १००% खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून होते. याकरिता सन २०२३ २४ मध्ये महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाजात ₹ १६४.३९ कोटी तरतूद प्रस्ताविली आहे.दि.३१.०३.२०२२ पर्यंत माध्यमिक शाळांकरीता एकूण अनुदानाची मुंबई महानगरपालिकेस ₹ १,००३.०० कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे.

 

शिक्षण खात्यासाठी महत्वाच्या तरतूदी

खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद
व्हरच्युल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 सा कोटींची तरतूद याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 | कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम 2023-24 मध्ये ही सुरू राहणार असून यामध्ये गणवेश पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, | शालांत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शालेय आरोग्य कार्यक्रम, अत्याधुनिक बैठक व्यवस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28.45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कोटींची तरतूद करण्यात आली आहे.Skill training centers will be started for students

ML/KA/PGB
4 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *