शेपूचे थालीपीठ
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१)१ शेपू जुडी जराशी हिरवीगार पण पाने खूप जाड नसली पाहिजेत. गर्द हिरवीगार जूण(?) असते. (जूण हा आजीचा शब्द होता. त्याचा अर्थ एवढाच की जुनी.) स्वच्छ धूवून बारीक खूरडून ठेवायची,
२) थालीपिठ भाजणी,
३)कांदा अतिशय बारीक कापलेला,
४)कोथींबीर बारीक चिरलेली,
५)किंचीत आमचूर पॉवडर,
६)अगदी चिमटीभर ओवा भरडलेला(हवाच असेल तर),
७)बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीप्रमाणे(लहान मूल खाणार असतील मिरवी मोठी कापून मग काढून टाकावी पाण्यातून)
८)शोभेला तिळ हवे
२ वाट्या तांदूळ पिठ,
१ वाटी हिरव्या मूगाच्या डाळीचे पिठ(हिरवट असते, चव छान लागते),
१/२ वाटी बेसन(काला चना बेसन उत्तम),
पाव वाटी कणीक,
४ चमचे ज्वारी,
२ चमचे बाजरी,
२ मोठे चमचे धणा पॉवडर,
दिड चमचा जीरा पॉवडर,
हिंग,
१ मोठा बडीशेप पॉवडर,
सगळ्या पॉवडरी सोडून पिठ जराशीच १० मिनीटे भाजून घेवून फ्रीजमध्ये ठेवायची. मग सरते शेवटी पॉवडरी,हिंग टाकून पुन्हा भाजावी पिठ ३ एक मिनीटे,झाली भाजणी तयार. हि फ्रीजमध्ये टिकते
क्रमवार पाककृती:
शेपू हा रक्ताला खूप चांगला असे असल्याने हि भाजी घरी लहानपणापासून खात आलेय वेगवेगळ्या पद्धतीने. त्यात हे थालीपिठ खूप फेव. सर्व शेपू गुणधर्म लिहित बसले तर फूड मायक्रोचा क्लास सुरू होइल. असो.
१.अगदी एक चमचा तेल पातेल्यात घालून कांदा घालून परतायचा, अर्धवट झाकण मारून नरम करायचा.
२. त्यातच मग मिरची घालावी.
३. जरासाच काळा/गोडा मसाला घालून परतायचा कारण थालीपिठाच्या भाजणीत असते ना ध/जीरा पूड,
४. मला लसूण आवडते म्हणून मी अगदी बारीक करून घालते.
५.मग शेवटी आमचूर घालून पुन्हा अर्धवट झाकन मारावे. मग खुरडलेला शेपू टाकून परतावे. ज्यास्त शिजवायचा नाही. मग उकळते दोन कप भाजणी दिड कप पाणी घालून उकळी आली भाजणी मिक्स करावी. गरगरा चमच्याने फिरवून गॅस बंद करून झाकण मारावे.
६. मग हाताला जरासेच तेल लावून चांगले मळून घ्यावे मग एकेक गोळी घेवून लाटावे सरसरीत तांदूळ पिठी वर. नसेल जमत तर प्लॅस्टीक रॅप वर लाटावे. फोर्क ने जरासे टोचे मारावे व नॉन्स्टीक वर परतावे.
७. मस्त कुरकुरीत थालीपिठ तयार. बरोबर ग्रीक दही व ताजी पटकन जरासे शेंगदाने+लसून्+सुखे खोबरे+ लाल मसाला+ सी सॉल्ट भाजून भरड वाटलेली चटणी.
ML/ML/PGB
9 Aug 2024