श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे वाशीम जिल्ह्यात उत्साहात आगमन

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात शेगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज वाशीम जिल्ह्यात आगमन झाले. हजारो भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह पांढऱ्या शुभ्र गणवेशात शिस्तीत ही पालखी १३ जूनला शेगावहून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पुढील चार दिवस श्रींच्या पालखीचा वाशीम जिल्ह्यातील डव्हा, शिरपूर, मसला पेन आणि रिसोड येथे मुक्काम असणार आहे.
दरम्यान, अकोला-वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या पातूर घाट वळणावरून पालखी मार्गस्थ होतांना पालखीचे ड्रोण कॅमेरामध्ये टिपलेले विहंगमय दृश्य पालखीची शिस्तबद्धता, भव्यता आणि दिव्यता दर्शवून गेले.
ML/ML/SL
19 June 2024