शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी चा मान शिवराज राक्षे ने मिळवला आहे.
गत 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे किताबी लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते , त्यात शिवराज राक्षेने प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि मानाची गदा जिंकली.Shivraj Rakshe Nava Maharashtra Kesari
तत्पूर्वी, माती विभागात झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखला धूळ चारली. तर शिवराजने अहमदनगरच्या हर्षवर्धन सदगीर याला अस्मान दाखवले होते.
कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ
राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 4 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे.
तसेच, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
14 Jan. 2023