शिवसेना एकच गट वैगरे काही नाही
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray नी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.Shiv Sena is nothing but a single group यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे काही नाही.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे.शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक न्यायदेवतेचे मी आभार मानतो. निकालपत्रात परखडपणे मत नोंदवण्यात आले आहेत. संजय राऊतांच्या धाडसाच कौतुक. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्रीय यंत्रणांचा दुरउपयोग करुन अनेक पक्ष फोडण्यात येत आहेत. हे सर्वकाही देश पाहत आहे. न्यायव्यवस्था अंकिता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संकटाच्या काळा सोबत उभा राहतो तो खरा मित्र आहे. संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलं जाऊ शकतं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
ML/KA/PGB
10 Nov .2022