सभापती शिंदे यांनी दिल्या गणेशोत्सवांना भेटी

अहिल्यानगर दि ३१– महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरातील विविध गणेश मंडळांना स्वतः गाडी चालवत भेटी दिल्या. या विशेष उपक्रमाद्वारे त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला व गणेशमंडळांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.
प्रा. शिंदे यांनी शहरातील प्रमुख मंडळांना भेट देऊन मंडळातील कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव हा महाराष्ट्राची परंपरा असून सामाजिक ऐक्य, संस्कार आणि एकतेचा संदेश देतो, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. स्वतः गाडी चालवत नागरिकांमध्ये मिसळत मंडळांना भेट दिल्यामुळे स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सभापतींच्या साधेपणाचे आणि लोकसंग्रहाचे विशेष कौतुक केले.ML/ML/MS