शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
अलिबागमुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगडमधील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी या त्यांच्या मूळ गावी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मिनाक्षीताई या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.
शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती. विधासभेतील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती , अनेक विषयांवर त्यांनी केलेली भाषणे अभ्यासपूर्ण आणि ओघावत्या सुंदर मराठी भाषेत असायची. Shekap leader, former minister Meenakshi Patil passed away
PGB/ML/PGB
29 March 2024